Ganeshotsav 2023: फोटोफ्रेमच्या साहित्यातून नक्षीदार मखर! पर्यावरणपूरक, टिकाऊमुळे ग्राहकांचीही मागणी

Eco-friendly Makhars available in the market to decorate Ganapati at home.
Eco-friendly Makhars available in the market to decorate Ganapati at home.esakal
Updated on

Ganeshotsav 2023 : लाडक्या बापाच्या आगमनासाठी सगळेच आतुर आहेत. आरास सजावट करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली असून, पर्यावरपूरक टिकाऊ वस्तूंनाच ग्राहकांची मागणी आहे.

फोटोफ्रेमच्या साहित्यातून बनविलेले नक्षीदार पर्यावरणपूरक मखर ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. (Ganeshotsav 2023 disigned Makhar from Photoframe Materials Eco friendly durable and also demanded by consumers nashik)

गणेशोत्सवाला मंगळवारी (ता. १९) सुरवात होत आहे. घरगुती गणपतीसाठी आरास करण्यासाठी विविध साहित्य गेल्या काही दिवसांपासून दालनांमध्ये दाखल झाले आहेत. त्यात फोटोफ्रेमच्या साहित्यातून नक्षीदार राजमुद्रा, चांद्रयान-३ ची थीम असलेले मखर ग्राहकांचे लक्ष आकर्षित करीत आहे.

तीन हजारांपासून पंधरा हजारांपर्यंत किंमत असली तरी पाच वर्षे टिकणार असल्याने ग्राहकांचा ओढा या मखरकडे जास्त आहे. आरास सजविण्यासाठी मोर, बाप्पाचे वहन फिरता मुशकसह विविध वस्तूंचे अनेक प्रकार ग्राहकांचे लक्ष केंद्रित करीत आहे.

पर्यावरणपूरक आराससाठी फोटोफ्रेमिंगच्या वस्तू मखरमध्ये वापरण्यात आल्या असून, विविध १६ प्रकार आहे. गणेशोत्सवातील आराससाठी लागणारे विविध लायटिंग, फोकस, इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही मोठी मागणी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Eco-friendly Makhars available in the market to decorate Ganapati at home.
Ganeshotsav 2023 : गणेश चतुर्थीची शाळांना सुटी जाहीर, कधीपर्यंत शाळा बंद राहणार? शिक्षण विभागानं दिली महत्त्वाची अपडेट

"भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाच नाशिककर प्राधान्य देत आहे. शनिवार व रविवार सुटीचा दिवस असल्याने या वस्तूंची मोठी खरेदी झाली."- नीलेश पाचोरकर, विक्रेता

"गणेशोत्सवासाठी खास आरास सजविण्यासाठी फोटोफ्रेमच्या साहित्यातून विविध कलाकृतीतून नक्षीदार पर्यावरणपूरक मखर तयार करण्यात आले आहे. राजमुद्रा, चांद्रयान-३ थीम, मंदिर असे सोळा प्रकार मखरांसाठी आहे. पाच वर्षे टिकाऊ असल्याने ग्राहकांचीही मोठी मागणी आहे."

- नीलेश पाचोरकर, व्यावसायिक

Eco-friendly Makhars available in the market to decorate Ganapati at home.
Ganeshotsav : गणेश प्रतिष्ठापनेमुळे जाणून घ्या पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()