Ganeshotsav 2023: सोशल मीडियावर गणपती बाप्पांची एकच धूम! ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ गाण्याची भुरळ कायम

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023esakal
Updated on

इगतपुरी : सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचे मोठ्या दिमाखात आगमन झाले आहे. बघता बघता पाच दिवस उलटले आहेत. मागील मंगळवारपासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे.

घरातील गणपतीची आरास, तसेच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देणारे मेसेज मित्र- मैत्रिणींना शेअर केले जात आहेत. (Ganeshotsav 2023 Ganpati Bappa craze on Social Media charm of song papani ganpati anla nashik)

मित्र परिवार,नातेवाइकांना भेटणे शक्य नसल्याने व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम,मेसेंजर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

नेटकऱ्यांनी श्री गणेशाचे फोटो एकमेकांना फॉरवर्ड केले जात आहेत. वेगवेगळे व्हिडिओ, स्टिकर्स, आरती संग्रहामुळे सोशल मीडिया बाप्पामय झाल्याचे सध्या दिसून येत आहे.

गणेशोत्सवाला गेल्या मंगळवार (ता. १९)पासून प्रारंभ झाला झाले .एक- दोन निर्बंधाचा अपवाद वगळता यंदा या उत्सवात कमालीचा जल्लोष व उत्साह दिसून येत आहे.

सोशल मीडियावर सर्वत्र गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. नेटकरी बाप्पांचे मॅसेज व फोटो फॉरवर्ड करीत आहेत.

दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरीही बाप्पांची अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात प्रतिष्ठापना झाली आहे. दरवर्षी दिसणारा आरत्यांचा गजर अन् भक्तीचा जागर सध्या अमाप उत्साहात पाहायला मिळत आहे.

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023: कृष्णातीरावरचा गणपती, एका दगडातली मूर्ती अन् मत्स्याकार मंदिर; गणेशोत्सवात 'इथे' जायलाच हवं!

यामुळे भक्तांचा उत्साह सर्वत्र कायम दिसून येत आहे. हा उत्साह आता अनंत चतुर्थीपर्यंत सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धूम कायम राहणार आहे.

गणेशोत्सव सुरू झाल्यापासुन सोशल मीडियासह युट्यूबर व इतर समाज माध्यमांवर ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे प्रचंड व्हायरल झाले आहे. छोटी छोटी मुलं त्यावर रिल्स बनविताना दिसत आहेत.

या गाण्यातील बालकलाकार बीड जिल्ह्यातील साईराज केंद्रे हा या गाण्यामुळे घरोघरी पोहोचला. त्याच्यासोबतच आता चिमुकली स्टार मायरा वैकुळ आणि साईराजने एकत्र व्हिडिओ तयार केलाय.

या गाण्यावर दोघांनी डान्स करत प्रेक्षकांना वेगळीच भुरळ घातली आहे.गणेशोत्सावत या गाण्याचा सर्वत्र बोलबाला आहे.

Ganeshotsav 2023
Ganeshotsav 2023 : लीफ व्हिलेजमध्ये पोहोचला बाप्पा; गणपतीसोबत दिसले नारुतो आणि सासुके! पाहा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.