Ganeshotsav 2023 :रविवार कारंजा मित्रमंडळाला शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत. मंडळाची स्थापना गंगाप्रसाद पन्नालाल हलवाई यांनी १९१८ ला केली. इंग्रजांच्या काळात त्यांनी पाच वर्ष दुकानात गणपतीची स्थापना केली.
मंडळाने भारतातील प्रमुख मंदिरांचे देखावे आतापर्यंत सादर केले आहे. (Ganeshotsav 2023 Kedarnath spectacle to be performed by ravivar Karanja Mandal nashik)
२५ वर्षापासून धर्मार्थ दवाखानाच्या माध्यमातून नाममात्र दरात रुग्णांची सेवा करून त्यांना मोफत औषधोपचार केले जात आहे. आपत्कालीन स्थितीत भूकंप, पूर आदींना मदतीचा हात मंडळाने दिला आहे.
२००३ ला झालेल्या कुंभमेळ्यात मंडळाने मीनाक्षी मंदिराचा देखावा केला. तर २०१५ ला झालेल्या कुंभमेळ्यात भाविकांसाठी विविध उपक्रमातून भक्तांची सेवा केली होती. यंदा मुंबईच्या सेट डिझाइनरकडून केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येत आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत सामूहिक अथर्वशीर्ष पठन, डाळे, तपासणी, रक्तदान शिबिर, सत्यविनायक पूजन, नेपाळचे रुद्राक्षवाटप आदी उपक्रम यंदा राबविण्यात येणार आहे. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक व विसर्जनाला अघोरी तांडव हे आकर्षण ठरणार असल्याचे रविवार कारंजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांनी दिली.
मंडळाची वैशिष्ट्ये
- सेट डिझाइनरकडून केदारनाथ मंदिराची प्रतिकृती
- विसर्जन मिरवणुकीत अघोरी तांडव
-विविध उपक्रमातून भक्तांची सेवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.