Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाचा गणेश मंडळांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. वेगवेगळ्या संकल्पना घेऊन गणेश मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे.
बाप्पाच्या आगमन मिरवणुकीपासून तर स्थापनेपर्यंतची जय्यत तयारी सूक्ष्म पद्धतीने गणेश मंडळाचे पदाधिकारी करत आहेत. (Ganeshotsav 2023 Mandals prepare triumphantly for Bappa arrival nashik)
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवातील मिरवणूक, स्थापना, देखावे, दहा दिवसांतील कार्यक्रम निश्चिती आदी नियोजन करताना पदाधिकारी दिसत आहेत.
गणेशोत्सवात नाशिककरांचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी यंदा गणेश मंडळ मिरवणुकीत आकर्षक प्रयोग करणार आहे. त्यामुळे नाशिककरांना यंदा वेगळ्या अनुभूतीची प्रचीती येणार आहे.
केदारनाथ मंडळाची साकारणार प्रतिकृती
रविवार कारजांवरील चांदीचा गणपती मंडळातर्फे काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत वाराणसीमधील साधूंचा सहभाग लक्षणीय ठरणार असून, महादेवाची आरती विशेष आकर्षण ठरणार आहे. मंडळाने यंदा श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्याचे ठरविले आहे, त्याचे कामकाजही सुरू आहे.
रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव देखाव्याचे मंडप पूजन रविवारी (ता. २२) मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या हस्ते झाले. श्री. चंदर, देखावा तयार करणारे मुंबईचे कारागीर कुणाल साबळे आदी उपस्थित होते.
देखाव्यासाठी मुंबई, पेणचे कारागीर
मंडळातील देखावे, मिरवणुकीतील विविध आकर्षक देखावे तयार करण्यासाठी मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे. मंडळांनी यंदा देखावे तयार करण्यासाठी मुंबई, पेणमधून कारागीर बोलावले असून, त्यांचे काम सुरू झाले आहे.
"मंडळाने यंदा श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती उभारण्याचे ठरविले आहे. प्रतिकृती उभारण्याचे काम रविवारी सुरू करण्यात आले आहे. मिरवणुकीत वाराणसीतील साधूंचा सहभाग, शंकर महादेवाची आरती विशेष आकर्षण ठरेल."
- नरेंद्र पवार, अध्यक्ष, चांदीचा गणपती
"श्री शिवसेना व्यायामशाळा व तालीम संघाच्या नाशिकचा महागणपती मंडळातर्फे तयारी सुरू करण्यात आली असून, पेणमधून कारागीर बोलावले आहेत. यंदा नाशिककरांना नाशिकचा महागणपती मिरवणुकीत वेगळी अनुभूती मिळेल."
- संदीप कानडे, अध्यक्ष, नाशिकचा महागणपती मंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.