Ganeshotsav: बाप्पांच्या स्वागतासाठी अवघी तरुणाई सज्ज! आराससाठी वस्तू व गणेशमूर्ती खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

A crowd gathered to buy goods and Ganesha idols for Ganapati Bappa's Aras
A crowd gathered to buy goods and Ganesha idols for Ganapati Bappa's Arasesakal
Updated on

Ganeshotsav 2023 : लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. घराघरांत येत्या मंगळवार (ता. १९)पासून भक्तिभावाने श्रीगणेशाची स्थापना होणार आहे. यामुळे शहरासह तालुक्यातील बाजारपेठांना यात्रेचे स्वरूप आले आहे.

बाप्पांच्या स्वागतासाठी अवघी तरुणाई सज्ज झाली आहे. (Ganeshotsav 2023 Only youth ready to welcome Bappa Crowd of customers to buy items for Aras and Ganesha idols nashik)

गणपतीसाठी आरास करण्यासाठी हव्या असलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी इगतपुरी, घोटी, टाकेद, गोंदे आदी भागांत ग्राहकांची रविवारी (ता. १७) गर्दी झाली होती. शहराच्या विविध भागांत भक्तीचा रंग पाहायला मिळत आहेत.

गावात सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. झेंडू व इतर फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सजावटीच्या विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सजावट साहित्याच्या किमती काहीअंशी स्थिर असून, खरेदीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A crowd gathered to buy goods and Ganesha idols for Ganapati Bappa's Aras
Ganeshotsav 2023 : गणेश चतुर्थीची शाळांना सुटी जाहीर, कधीपर्यंत शाळा बंद राहणार? शिक्षण विभागानं दिली महत्त्वाची अपडेट

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबतच घरोघरी बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून हा उत्सव साजरा होतो. गणरायाच्या मूर्तीभोवती व समोर आकर्षक सजावटही गणेश भक्तांकडून करण्यात येते.

गणपतीसाठी आकर्षक रेडिमेड मखर, झालर, पडदे, लायटिंगच्या माळा, कारंजे यासह मूर्तीसाठी फेटा, मुकुट, आसन खड्यांचा वापर करून तयार केलेले हार, अशा विविध सजावटीच्या साहित्यासह पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग सुरू आहे.

A crowd gathered to buy goods and Ganesha idols for Ganapati Bappa's Aras
Ganeshotsav : गणेश प्रतिष्ठापनेमुळे जाणून घ्या पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.