Ganeshotsav 2023 : काजू, बदाम, चॉकलेटमध्ये सजला बाप्पा! मूर्ती बुकिंगनंतर वर्क करण्यावर भक्तांचा कल

Shree Ganesha idols in different forms have entered the market
Shree Ganesha idols in different forms have entered the marketesakal
Updated on

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात दहा दिवसांत काय सजावट असावी यासाठी विविध संकल्पना राबविल्या जातात. मूर्ती कशी असावी यावरही भर असतो. आता लालबागचा राजा, सिद्धिविनायक, दगडूशेठ या पारंपारिक गणेश मूर्तींची मागणी आता मागे पडली आहे.

यंदा गणेशमूर्ती हटके कशी असेल यावर विक्रेत्यांनी भर दिला असून भक्तांना आकर्षित करण्यासाठी यंदा आर्टिफिशियल काजू, बदाम, अक्रोड, चॉकलेटचा वापर करून बाप्पाच्या मूर्ती सजविण्याकडे कल वाढला आहे. (ganeshotsav 2023 trend to decorate Bappa idols using artificial cashews almonds walnuts chocolates nashik news )

गणेशोत्सवात नाशिककरांकडून बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळत आहे. गणेशमूर्तीला फेटा घालून साज दिला जात होता. आता मात्र छोट्या मूर्तींपासून मंडळाच्या गणेशमूर्तींना डायमंड, स्टोनसह एलईडी लायटिंग वापरली जात आहे. फेटा, शॉलसह वेलवेटचे झालर वापरून हटके साज देण्याचा प्रयत्न विक्रेत्यांकडून केला जात आहे.

मूर्ती आकर्षित दिसण्यासाठी मूर्तीवर वर्क करून विक्री केली जात असल्याचे चित्र असून यासाठी साज देण्यासाठी कलाकार काम करीत आहे. मूर्ती घेऊन साज देण्यासाठी भक्तांकडून मोठी बुकिंग आहे.

मूर्ती बुक केल्यानंतर आवडीनुसार साज देण्यासाठी हटके लुक असावा यासाठी प्रयत्न केले जात आहे. सरस्वती, महालक्ष्मी रूपात गणेशमूर्ती कलाकारांनी सजविल्या असून मूर्तीला पांढरी व लाल रंगाच्या साडीचाही वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shree Ganesha idols in different forms have entered the market
Nashik Ganeshotsav: गणेश मंडळाचे परवाना शुल्क माफ
 खास बच्चेकंपनीला डोळ्यांसमोर ठेऊन श्रीगणेशाच्या विविध रूपातील मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत.  (छायाचित्रे : केशव मते)
खास बच्चेकंपनीला डोळ्यांसमोर ठेऊन श्रीगणेशाच्या विविध रूपातील मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत. (छायाचित्रे : केशव मते)esakal

शंकराच्या रूपात असलेल्या मूर्तीवर आर्टिफिशियल शंकराच्या केसांची असलेली रचना वाघाचे पट्टे असलेली झालर वापरण्यात आली आहे. तसेच, पूर्ण मूर्तीवर फुलांनी केलेले वर्कही विशेष आकर्षण ठरत आहे. साध्या मूर्तीला हटके लुक देण्यासाठी नाशिककरांकडूनही मागणी मोठी आहे. छोट्या मूर्तींसाठी पाचशे ते हजार रुपये सजविण्याचे घेतले जात असून मोठ्या मूर्तींना हाच आकडा साडेतीन ते चार हजारांपर्यंत घेतला जात आहे.

"कपडे, झालर, डायमंड स्टोनसह बाप्पाच्या मूर्तीवर आर्टिफिशियल बदाम अक्रोड, काजू, इलायची, चॉकलेट, हळद आदींचा वापर करून मूर्ती आकर्षित कशी दिसेल, भक्तांना भावण्यासाठी विविध प्रकारचे वर्क केले जात आहे." - सुमेश गुप्ता, सजावटकार

Shree Ganesha idols in different forms have entered the market
Ganeshotsav 2023: श्रींचे वेगळेपण ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू! ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्तीवर अखेरचा हात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.