Ganeshotsav 2023: गणेशोत्सवात बसणार महागाईची झळ! कच्चा माल २५ टक्के अन मजुरीतही वाढ

Sculptor painting Ganesha idols.
Sculptor painting Ganesha idols.esakal
Updated on

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपला आहे. गणेशमूर्ती बनविण्याकडे मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे.

हजारो गणेशमूर्ती साकारल्या गेल्या आहेत. सात इंचापासून सात फुटापर्यंत उंच मूर्ती तयार झाल्या असून, रात्रंदिवस मूर्ती बनविण्यासाठी कारागीर मेहनत घेत आहे.

आतापर्यंत गणेशमूर्तींचे जवळपास २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. कच्च्या मालाच्या किमतीसह कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाल्याने यंदा गणेशमूर्ती महागणार असल्याचे दिसत आहे. (Ganeshotsav 2023 will hit by inflation 25 percent increase in raw materials and wages nashik)

मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली असून, गणेशमूर्तींच्या किमती २५ टक्क्यांनी वाढणार आहेत. बुकिंगनुसारही मूर्तिकार मूर्ती बनवत आहे.

मंडळाचे पदाधिकारीही शहरातील विविध कारखान्यांवर मूर्ती बुकिंग करण्यासाठी गर्दी करीत आहे. गणेशभक्तांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, ढोल पथकांची तयारीही जय्यत सुरू आहे.

अशा आहेत कच्च्या मालाच्या किमती

गणेशमूर्ती बनविण्यासाठी कारागिरांना काथा, पीओपी, रंग अशा विविध वस्तू लागतात. ५० किलो काथ्याची किंमत पाचशेने वाढली असून, तीन हजार पाचशेपर्यंत काथा मिळत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sculptor painting Ganesha idols.
Ganeshotsav 2023: ढोल- ताशांचा निनाद गुंजणार! गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सरावास प्रारंभ

तर पिओपीची वीस किलोच्या गोणीमागे ५० रुपये वाढले असून, आता गोणी चारशे रुपयांपर्यंत मिळत आहे. कारागिरांच्या मजुरीतही वाढ झाली असून गतवर्षी बारा हजार रुपये घेणारे मजूर आता पंधरा हजार रुपये घेत आहे.

अशी होते निर्मिती

मूर्तीच्या विविध भागांचे साचे एकत्र करून गणेशमूर्ती तयार केली जाते. मूर्तीची बांधणी करून पॉलिश, टचअप करून रंगकाम केले जाते. त्यानंतर सोनेरी किंवा चंदेरी वर्क मूर्तीवर केले जाते. मूर्तिकारांची गणेशमूर्तीची बांधणी झाली असून पॉलिश करण्याचे काम सुरू आहे.

"कारखान्यात सध्या दररोज दहा छोट्या मूर्ती, एक मोठी गणेशमूर्ती बनविण्याचे काम सुरू आहे. यंदा कच्च्या मालासह मजुरीही वाढल्याने गणेशमूर्तींच्या किमतीत वाढ दिसेल."

- मनोज भाटी, व्यावसायिक, मूर्तिकार

Sculptor painting Ganesha idols.
Ganeshotsav : नियोजनाच्या बैठकीवरून गणेश मंडळांत नाराजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.