Crime : गणेशवाडीतील मंडई होतेय आता चोरट्यांचे ‘लक्ष्य’

Ganeshwadi Market News
Ganeshwadi Market Newsesakal
Updated on

नाशिक : भुरट्या चोरट्यांचे लक्ष आता गणेशवाडीतील भाजी मंडईकडे गेले आहे. अवघ्या दहा वीस रुपयांच्या लोखंडासाठी तेथील सिमेंटचे पक्के ओटे रात्रीच्या वेळी तोडले जात आहेत. मंडईतील रेलिंग, दरवाजे आधीच गायब झाले असून, संबंधित यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केल्याने आता चोरट्यांकडून येथील सिमेंटचे पक्के ओटेच ‘लक्ष्य’ केले जात आहेत. (Ganeshwadi market is now target of thieves Nashik Latest Marathi News)

गंगाघाटावरील पारंपारिक भाजी बाजाराचे स्थलांतर करण्यासाठी नाशिक महापालिकेने या मंडईचे बांधकाम केले. मात्र, सुरवातीपासूनच या ठिकाणी व्यवसाय करण्यास भाजी विक्रेत्यांनी नकार दिला. बांधकामानंतर तब्बल दहा वर्षे ही मंडई रिकामीच होती. तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी भाजी विक्रेत्यांना विक्रीसाठी ओटे देण्यात आले, परंतु त्याकडे मोठ्या प्रमाणावर भाजी विक्रेत्यांनी दुर्लक्ष करत शहराच्या अन्य भागात भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.

सध्या या मंडईच्या अर्ध्या भागात भाजी व फूल विक्रेते बसतात. परंतु, गाडगे महाराज पुलाकडील अर्ध्या भागाचा ताबा या भिकारी, गुर्दल्ल्यांनी घेतला आहे. त्यामुळे या भागाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. मध्यंतरी अतिक्रमण विरोधी मोहीम राबवून या भिकाऱ्यांना हुसकावून लावले होते, मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. किरकोळ लोखंडासाठी सिमेंटचे पक्के ओटे तोडण्यात येत असून, आतापर्यंत चार ते पाच ओटे तोडून तेथील लोखंड गायब करण्यात आले आहे.

Ganeshwadi Market News
Nashik : वाहनांच्या पुढे लोटांगण घालत अतिक्रमण काढण्यास विरोध

दरवाजे, रेलिंगही गायब

मंडईच्या तळमजल्यावर गाळे असून त्यावर गच्ची आहे. कधीकाळी मनपातर्फे वर जाण्याचा मार्ग कुलूप लावून बंदीस्त करण्यात आला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून वर जाण्याच्या मार्गावरील लोखंडी दरवाजे, गच्चीवरील रेलिंगही अर्धेअधिक गायब झाले आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षक ठेवल्यास या चोरीला काही प्रमाणात आळा बसेल, अन्यथा पूर्ण मंडईची वाताहात होईल, अशी सध्याची परिस्थिती आहे.

पुलांचे कठडे लांबविले

गणेशवाडीतील वाघाडी नाल्यावरील पुलावरही आता भुरट्यांचे लक्ष असून, त्या ठिकाणी लोखंडी गज गायब होत आहेत. पुलाच्या कठड्यांमधील लोखंड काढून घेतले जात असल्याने हा पूल अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे. मध्यंतरी स्मशानभूमी जवळील पुलाचे रेलिंगही चोरट्यांनी लांबविल्यावर त्यानंतर नवीन रेलिंग टाकण्यात आले.

"नाशिक महापालिकेने जनतेच्या कराच्या पैशातून या मंडईची उभारणी केली आहे. त्यामुळे तिचे रक्षण करणे ही मनपाचीच जबाबदारी आहे. त्यामुळे येथे सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी."

- नारायणराव पवार, व्यावसायिक

Ganeshwadi Market News
जिद्द : बांगडी व्यवसायातून उभ्या राहत बनल्या मॉलच्या मालकीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.