Nashik Crime News : टोळक्याकडून एकावर कोयत्याने हल्ला

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik News : अंबड, चुंचाळे येथील घरकुल संकुल परिसरात शनिवारी (ता.४) रात्री साडेदहाच्या सुमारास वाढदिवसानिमित्त केक कापत असताना आवाज होत असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या एकावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करीत कोयता व चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे.

याप्रकरणी अंबड पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे. (Gang on one koyta attack Nashik Crime News)

संविधान चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास शंकर अवचार तसेच त्यांचे भाऊ दिनकर व त्यांचा मित्र संतोष मोरे हे गप्पा मारत होते. याच दरम्यान, वाढदिवसानिमित्त केक कापण्याचा कार्यक्रम सुरू होता.

या वेळी मोठ्या प्रमाणात आवाज होत असल्याने अवचार यांनी कार्यक्रम शांतपणे करा, असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nashik Traffic News : ट्रॅफिक जामचा तिढा काही सुटेना; सायंकाळी 2 तास लागतात वाहनांच्या रांगाच रांगा

याचा राग आल्याने संशयित विशाल कुऱ्हाडे, जगदीश सोनवणे, सोन्या ऊर्फ गणेश कांबळे, वैभव राजगिरे, कैलास सोनपसारे, श्याम जाधव यासह पाच ते सहा जणांच्या टोळक्याने संतोष मोरे याच्या डोक्यात कोयता व धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले.

शंकर अवचार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल कुऱ्हाडे, सोन्या ऊर्फ गणेश कांबळे, कैलास सोनपसारे, जगदीश सोनवणे यांना अटक केली असून, इतर संशयितांचादेखील पोलिस शोध घेत आहे.

पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली व राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश मुगले तपास करीत आहे.

Crime News
Nashik Rain Update : शिर्डी सुरत महामार्गावर बाभळीचे झाड पडले उन्मळून; वाहतूक ठप्प

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()