वणी (जि. नाशिक) : वणी येथे बसस्थानक परिसरात रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास एका ४० वर्षीय महिलेवर सामुहिक अत्याचाराची घटना घडली असून संशयीत वीस ते पंचवीस वयोगटातील चार मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
घडलेला प्रकार असा की,
बुधवार (ता. २७) रोजी रात्री अकरा- साडे अकराच्या दरम्यान पीडीत महिला गावातील मेडिकल दुकानातून औषधी घेवून पायी घरी जात असतांना लघुशंकेसाठी बसस्थानक परिसरात गेली होती. याचवेळी दोन तरुणांनी बसस्थानकात येवून सदर महिलेला जबरदस्तीने बसस्थानकाच्या पश्चिम भागात निर्जनस्थळी नेत, पिडीतेवर जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला. याचवेळी परत दोन दुचाकीवरुन आलेल्या युवकांनीही सदर महिलेला नदीच्या दिशेने झुडपात उचलून नेत त्यांनीही जबरदस्तीने आळीपाळीने बलात्कार केला. सदर महिलेस जबरदस्तीने उचलून नेतांना एका व्यक्तीने बघीतल्यानंतर सदर व्यक्तीने पोलिसांत याबाबत माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी तातडीने दखल घेत पोलिस कर्मचा-यांना सुचना देत घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी बसस्थानक परिसरात एक दुचाकी आढळून आली. यावेळी काही पोलिस दबा धरून बसले होते. काही वेळानंतर दुचाकी घेण्यासाठी आलेल्या एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने सर्वांची नावे सांगितली. यानंतर पोलिसांनी सोमनाथ कैलास गायकवाड (वय-२३), संदिप अशोक पीठे (वय-२४), राजेंद्र दिपक गांगुर्डे (वय-२६), आकाश शंकर सिंग (वय-२४) सर्व राहणार इंदिरानगर वणी यांना ताब्यात घेवून अटक केली आहे. पिडीत महिलेवर ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय तपासणी करुन उपचार करण्यात आले. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक माधुरी केदार- कांगने, उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी पाहाणी करुन पोलिसांना तपासाविषयक मार्गदर्शन केले.
घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावर तपासणी केली. तसेच पोलिसांनी बसस्थानकात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचीही पाहाणी करुन परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत केले आहे. दरम्यान पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन चौघांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन अटक केली आहे.
वणी पोलीस ठाण्याचे सपोनि. स्वप्निल राजपुत, पोउनि रतन पगार, कर्मचारी बच्छाव, आण्णा जाधव, किरण धुळे, प्रदिप शिंदे यांनी तपास करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.