Ganga Maha Arti : नववर्षापासून होणार गंगामहाआरती; मुनगंटीवारांकडून 5 कोटींचा विशेष निधी

Sudhir Mungantivar on Ganga Maha Arti
Sudhir Mungantivar on Ganga Maha Artiesakal
Updated on

नाशिक रोड : अयोध्या हरिद्वार वाराणसीच्या धर्तीवर नाशिकमध्ये रोज गंगाआरती सुरू होणार असल्याचे सांस्कृतिक विभागाने सांगितले आहे. यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंगा आरतीसाठी पाच कोटींच्या विशेष निधीची तरतूद करणार असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शासकीय यंत्रणेला आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहे.नाशिकच्य ा रामकुंड परिसराचा होणार कायापालट व सुशोभीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. (Ganga Maha Aarti on godaghat will held from New Year 5 crore special fund from sudhir Mungantiwar Nashik News)

अयोध्या हरिद्वार वाराणसी तिरुपतीच्या धर्तीवर नाशिकमध्ये गंगा आरती व्हायला हवी यासाठी नाशिकचे महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी सांस्कृतिक मंत्रालयाला लेखी निवेदन दिले, त्याची दखल घेऊन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागील आठवड्यात नांदेड येथे महंतांची बैठक घेऊन आरतीसाठी विशेष पाच कोटीचा निधी मंजूर करणार असल्याचे सांगितले. लवकरच या गंगा आरतीसाठी आराखडा तयार केला जाणार आहे.

रामसृष्टी व गोदाघाट सुशोभीकरण

नाशिकचा गोदा घाट हा अधिकाधिक प्रसन्न दिसावा यासाठी ५० ते १०० फूट उंच राम सीतेची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात येणार आहे. अकरा चबुतरे गोदा आरतीसाठी बांधण्यात येणार आहे. यासाठी गोदा घाटाचे सुशोभीकरणही करण्यात येईल. महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, बांधकाम व्यवसायिक दिनेश चंदे, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, पीडब्ल्यूडीचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यात नुकत्याच दोन समन्वय बैठका झाल्या. गोदा घाटाच्या सुशोभीकरणाची पाहणी करण्यात आली आहे. लवकरच हा आराखडा शासनाला सादर केला जाणार असून नवीन वर्षापासून गोदा आरतीला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Sudhir Mungantivar on Ganga Maha Arti
Nashik : वीज सुरक्षेसाठी अभियंत्याने रचले गीत; सावधानतेची जाणीव होण्यासाठी जनजागृती

"नांदेड येथे बैठकीत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी मंजूर करण्याचे आश्वासन दिलेले असून जिल्हाधिकारींनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. यासाठी आराखडा तयार केला जात असून गोदाघाटाची दोन दिवसांपूर्वीच आम्ही पाहणी करून अधिकाऱ्यांना काही सूचना दिलेल्या आहेत. नवीन वर्षात शुभारंभ आम्ही करणार आहोत."

- महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, आनंदा आखाडा.-भगवे वस्त्र

"आरतीसाठी अकरा चबुतरे बांधणार असून यासाठी रामसिमतेची भव्य मूर्ती उभी करण्याचे नियोजन आहे. साधूमहंत व जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये गोदा घाट सुशोभीकरणाबरोबरच ठिकठिकाणी गोदा आरतीच्या दरम्यान स्क्रीन लावण्याचे नियोजन करीत आहोत. दहा दिवसात शासनाला आराखडा सादर होईल."

- सुशांत पाटील (आर्किटेक्ट) सफेद कोट

"गोदा आरती नाशिकची ओळख झाली पाहिजे, यासाठी आम्ही गोदा घाट सौंदर्यकरणाबरोबरच आरतीसाठी दानशूरांच्या मदतीने निधी उभा करत आहोत. ही आरती कायम शाश्वत रोज व्हायला हवी, यासाठी योजना आखत असून नाशिककरांनी आपला वाढदिवस गोदा आरतीने साजरा करावा यासाठी आम्ही आवाहन करणार आहोत"

- दिनेश चंदे, बांधकाम व्यावसायिक व गोदा आरती समन्वय समिती.

Sudhir Mungantivar on Ganga Maha Arti
Nashik | मल्टिमॉडेल लॉजेस्टिक पार्क संपूर्णपणे केंद्राच्या अनुदानातून : डॉ. भारती पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.