गरबाचा जल्लोष, Bollywoodची क्रेझ अन् नटुन-थटुन तरूणाई मैदानात

Garba Reference Image
Garba Reference Imageesakal
Updated on

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : गणरायाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे देणे घेऊन नवरात्रोत्सव येतो. घटस्थापना होऊन नवरात्रीच्या जागरणाला प्रांरभ होतो आणि सुरवात होते ती गरबाच्या जल्लोषाला. घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. २७) गरबामध्ये सहभागी होणारी जास्तीत-जास्त १८ ते २५ या वयोगटातील तरुण मंडळीचा सहभाग दिसला. ग्रामपंचायत निवडणूक तोंडावर असल्याने पिंपळगाव शहरातील इच्छुकांकडून गरबा दांडिया आयोजकांची संख्या वाढली आहे. (Garba cheering at Pimpalgaon Navratri 2022 Nashik News)

नवरात्रीनिमित्त आनंद सर्वत्र ओसंडून वाहत आहे. तरुणाई उत्साहाने गरबानिमित्त एकत्र आली आहे. पहिल्याच दिवशी बेधुंद होऊन गरबा नृत्यावर तरुणाईने ताल धरला. विशेषत: चिंचखेड रस्तावरील संतोषीमाता मंदिर, ग्रीनजीम नवरात्रोत्सव, तर उंबरखेड रस्त्यावरील जाणता राजा मित्र मंडळ, भाऊनगर गरबा उत्सव, लभडे गल्ली, दगूनानानगर, घोडकेनगरमध्ये गरबा उत्सवाला मोठी गर्दी उसळत आहे. शहरात काही ठिकाणी नवरात्रोत्सव मंडळांकडून गरब्याचे आयोजन केले आहे.

सायंकाळ होताच रोषणाईचा झगमगाट सर्वत्र पसरतो व बॉलीगुड गाण्यांनी साराच आसमंत दणाणून उठत आहे. मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्तांच्‍या रांगाच्या-रांगा लागत आहेत. तरुण-तरुणींची धावपळ तेवढ्याच जोमाने चालली आहे. मुलींनी खास नवीन विकत आणलेल्या घागरा चोलीपासून मेकअपची, अशी जय्यत तयारी गरबाच्या पहिल्या दिवशी सकाळपासून चाललेली पाहायला मिळत आहे. आपल्या मित्र-मैत्रिणीसोबतीने नटून थटून मैदानात आलेली तरुणाई गरबाच्या जल्लोषात धुंद होऊन ठेका धरत आहे.

Garba Reference Image
1 Station 1 Product Scheme : नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर पैठणी स्टॉल

सुरांची लकेर आसमंतात...

‘पंखिडा ओ... पंखिडा किंवा आज राधा को श्‍याम याद आ गया’, असी सुरांची लकेर आसमंतात उमटत आहे. मंडपाच्या मधोमध असणारे आर्केस्ट्रा, रंगीबेरंगी रोषणाईने सजविलेला वर्तुळ आणि हाय-फाय साभंड सर्व्हिसच्या जोरावरील बिट्स... या सर्वांनी तरुणासह प्रत्येकाचा मुड रोमांचित होऊन उठत आहे. बिट्च्या तालावर तरुणाई ठेका धरत आहे.

बुधवारी (ता. २८) रात्री मात्र पावसाने हजेरी लावल्याने गरबा खेळणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाळी. अचानक आलेल्या पावसामुळे काही भागातील वीजपुरवठा विस्कळित झाला. त्यामुळे तरुणाईच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले.

Garba Reference Image
PFI Case : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यालय पोलिसांकडून सील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()