School Nutrition Meal: शालेय पोषण आहारात ताजा भाजीपाला समावेशासाठी राज्यात शाळांमधून परसबाग

तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर १०० गुणांची स्पर्धा
School Nutrition
School Nutrition sakal
Updated on

School Nutrition Meal : पंतप्रधान पोषणशक्ती योजनेंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा साकारल्या जाणार आहेत. परसबागांमध्ये उत्पादित होणारा ताजा भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरण्यात येईल.

उपक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १०० गुण निश्‍चित करण्यात आले. (Gardening from schools in state for inclusion of fresh vegetables in school nutrition nashik)

हवामान परिस्थितीनुसार भाज्यांची लागवड, परसबाग व्यवस्थापन, विद्यार्थी-पालक-शिक्षक सहभाग, उत्पादित भाजीपाल्याचा आहारात समावेश, भाजीपाल्याची विक्री अशा बाबी स्पर्धेसाठी निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या स्पर्धेमुळे राज्यातील २२ हजार ९७३ शाळांमध्ये परसबाग तयार झाल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

School Nutrition
Nashik News: नमामि गोदा प्रकल्पासाठी ‘अल्मोंड्स’ संस्थेची नियुक्ती

प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर तीन शाळांसाठी प्रत्येकी बक्षिसांची रक्कम रुपयांमध्ये अशी : तालुका- ५ हजार- ३ हजार- २ हजार- १ हजार. जिल्हा- १० हजार- ७ हजार- ५ हजार- २ हजार.

राज्य- ५१ हजार- ३१ हजार- २१ हजार- ११ हजार. उपक्रमासाठी शाळांनी जवळचे कृषी विज्ञान केंद्र, कृषी शाळा, कृषी विभागाचे सहाय्यक- पर्यवेक्षक, कृषी क्षेत्रातील अशासकीय संस्था, सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषितज्ज्ञ यांचे सहकार्य घ्यायचे आहे.

स्पर्धेच्या मूल्यांकनासाठी शिक्षण, आहारतज्ज्ञ, कृषी, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी, स्थानिक प्रगतिशील शेतकऱ्यांची समिती स्थापन केली जाईल.

School Nutrition
Nashik News: यशवंत मंडई जागेवर बहुमजली पार्किंग! समायोजित आरक्षणाखाली पार्किंग स्लॉट वापर सुरू होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()