Nashik News : भाजीपाला बाजारात लसूणची आवक घटली. त्यामुळे येथे लसूणचा भडका उडाला आहे. २०२२ मध्ये शंभरला पाच किलो मिळणारा लसूण सद्या किरकोळ बाजारात तीनशे रुपये किलोने विकला जात आहे.
महागाईमुळे लसूण सर्वसामान्य गरिबांच्या भाजीतून गायब झाला आहे. लसूणऐवजी पाच ते दहा रुपयाला मिळणारा लसूण व अद्रकची पेस्ट वापरली जात आहे.(Garlic is currently being sold at Rs 300 per kg in retail market nashik news)
शहरात लसूणला वर्षभर मागणी असते. येथे मुस्लिम बहुल वस्त्या असल्याने नॉनव्हेज विक्री करणारी दुकाने, अंडाभुर्जी, चिकन टिक्का यांसह विविध दुकाने व घरात लसूणचा प्रामुख्याने वापर होतो. नॉनव्हेज बनविण्यासाठी अद्रक व लसूण मोठ्या प्रमाणात वापरले जातात.
येथे सप्टेंबरपासून लसूणची आवक घटली असून, त्याच्या फटका भाववाढीस झाला आहे. घाऊक बाजारात मध्यम आकाराचा लसूण दीडशे रुपये, तर मोठ्या कांडीचा लसूण अडीचशे रुपये किलोने विकला जात आहे.
लसूण महागल्याने येथे एका आठवड्याला एक टन माल विकला जात आहे. स्वस्ताईमध्ये आठवड्यात आठ ते दहा टन लसूणची विक्री होत होती. महागाईने लसूणला कचाट्यात घेतल्याने येथील ठराविक हातगाड्यांवर लसूण विक्रीस दिसत आहे. शहरात राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातून लसूण विक्रीसाठी येतो.
नवीन लसूण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारात येणार आहे. काही महिन्यांपूर्वी येथे इराण येथील पेरू आकाराचा गुलाबी लसूण विक्रीसाठी येत होता. इराणी लसूण पोकळ व त्याची चव खाण्यायोग्य नसल्याने मालेगावकरांनी तो बाजारातून हद्दपार केले.
लसूण महागल्याने पेस्टच्या वापर वाढला
सर्वत्र अद्रक व लसूणच्या किमती वाढल्या आहेत. गरिबांना तीनशे रुपये किलोने लसूण घेणे परवडत नाही. त्यामुळे बाजारात लसूण व अद्रक मिक्स येणारी पेस्ट भाज्यांमध्ये वापरली जात आहे.
अवघ्या पाच ते दहा रुपयांत मिळणारी पेस्टचा वापर करताना सर्वसामान्य नागरिक दिसत आहे. दहा रुपयांच्या पाऊचमध्ये दोन वेळेची भाजी होते. सध्या लसूण पेस्ट तयार करणाऱ्या कंपन्यांना ‘अच्छे दिन’ आले असून, झोपडपट्टी भागात या पेस्टच्या वापर व विक्रीत दुप्पटीने वाढ झाली आहे.
''शहरात लसूण मोठ्या प्रमाणात वापरतात. भाव कमी राहिल्यावर विक्री वाढते. लसूण महागल्याने अनेक हातगाड्यांवर आता पपई व इतर फळे विकली जात आहेत. आणखी काही दिवस भाव टिकून राहतील.''- दिलीप अभोनकर, लसूण व्यापारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.