Nashik News: गरुडेश्‍वर जि. प. शाळेला ‘ऊर्जा’; 5 वर्गखोल्यांसह किचनशेड, शौचालयांचे झाले नुतनीकरण

Sarpanch Venutai Botte while inaugurating the various works done with the help of Urja Foundation in the primary school.
Sarpanch Venutai Botte while inaugurating the various works done with the help of Urja Foundation in the primary school.esakal
Updated on

इगतपुरी (जि. नाशिक) : गरुडेश्‍वर (ता. इगतपूरी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अंधेरी, मुंबई येथील ऊर्जा चॅरिटी फाउंडेशन ग्रुपतर्फे आर्थिक मदतीतून पाच वर्गखोल्या, किचनशेड, मुलींचे शौचालय, तसेच ओपन पॅसेज आणि व्हरांडा यांची दुरुस्ती करण्यात आली. या मदतीमुळे शाळेला नव्याने ऊर्जा मिळाली आहे. (Garudeshwar ZP school 5 classrooms with kitchen shed toilets renovated Nashik News)

या कमांमध्ये वर्ग खोल्या व किचनशेडची उंची वाढवणे, प्लास्टर, फ्लोरिंग टाईल्स, स्लाइंडिग खिडक्या, दरवाजे, मुलींच्या शौचालयात युरिन कंपार्ट वाढवणे, वॉल टाईल्स, फ्लोरिंग टाईल्स, टॉयलेट दुरुस्ती, वॉश बेसिन, टॉयलेट बाहेरील पॅसेज, पार्किंग टाईल्स आदींचे नुतनीकरण करण्यात आले.

व्हरांड्यातील पार्किंग टाईल्सचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले. या कामांच्या उद्‌घाटनावेळी ऊर्जा ग्रुपच्या सदस्या, सदस्य उपस्थित होते. शिक्षक ज्ञानेश्‍वर बांगर यांनी कामांबाबत माहिती दिली.

तत्पूर्वी गावातून मिरवणूक काढून, शाळेच्या प्रवेशद्वारावर औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अशोक पोटकुले, ग्रामपंचायत सदस्य श्रीराम बोटे, सुरेखा वाघ, कविता गभाले, प्रमोद परदेशी, आप्पा जाधव, अतुल अहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी ‘आलं आदिवासी वादळ’, ‘राजं आलं’ या गाण्यांवर उत्तम नृत्य सादर केले. खास फळ विहिरवाडी येथून आलेल्या आदिवासी बांधवांनी ‘कामडवन’ हे पारंपरिक नृत्य सादर केले. फाउंडेशनतर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

Sarpanch Venutai Botte while inaugurating the various works done with the help of Urja Foundation in the primary school.
Ginger Farming : वावरची पॉवर; अद्रकाची शेती 2 एकरांवर, उत्पन्न मिळाले 10 लाखांवर!

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरामण वारघडे यांच्या शेतीला भेट देण्यात आली. पंढरीनाथ कदम यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक देविदास गांगुर्डे व राजेंद्र पवार यांनी आभार मानले.

सरपंच वेणूताई बोटे, उपसरपंच निर्मला पोटकुले, संपत पोटकुले, तुकाराम पोटकुले, कुंडलिक पोटकुले, पोपट लोहकरे, दत्तू पोटकुले, बाळू गोडे, अरुण डगळे, शरद खोकले, सूरज खोकले, विजू गवारी, अंतू वारघडे, ज्ञानेश्‍वर वारघडे, पांडुरंग करटूले, सोमनाथ कुंदे, शिवाजी वारघडे, संजू लोहरे, पॅडी फोडसे यांच्यासह शिक्षक, पालक, महिला, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

"ऊर्जा फाउंडेशनच्या मदतीने गेल्या तीन वर्षांपासून गरुडेश्‍वर शाळेत अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. दुरुस्तीची कामे करून जणू शाळेचा जीर्णोद्धार झाला आहे. मुलांसाठी सर्व शैक्षणिक, डिजिटल, भौतिक सुविधा उपलब्ध झाल्याबद्दल मनस्वी आनंद वाटतो. या कामात गावाचे आणि सहकाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले."

-ज्ञानेश्‍वर बांगर, प्राथमिक शिक्षक, गरुडेश्‍वर

Sarpanch Venutai Botte while inaugurating the various works done with the help of Urja Foundation in the primary school.
LPG Rates Hike : स्वयंपाकघरात पुन्हा अवतरल्या चुली; गॅस सिलिंडर महागाईने कोलमडले गृहिणींचे आर्थिक गणित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.