Nashik : पाणी वळविण्यासाठी सरस्वती नाल्यावर गेट

Rainwater drainage scheme Latest Marathi News
Rainwater drainage scheme Latest Marathi Newsesakal
Updated on

नाशिक : दरवर्षी पावसाळ्यात सराफ बाजारात पाणी साचते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने सरस्वती नाला येथे पर्जन्यकाळात (Monsoon) गेट लावून नाले मार्गाने येणारे पाणी रुंद मार्गाने पावसाळी गटार योजनेला (Rainwater drainage scheme) जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. (Gate on Saraswati Nala to divert water Nashik latest marathi news)

मुंबई नाका, सारडा सर्कल, दूध बाजार, भद्रकाली, प्रकाश सुपारी व पुढे दहिपूलमार्गे नैसर्गिक नाला गोदावरी नदी पात्राच्या बाजूने ड्रेनेजला जोडण्यात आला आहे. मेनरोडपर्यंत सरस्वती नाला रुंद आहे. परंतु, ड्रेनेजच्या जोडणीपर्यंत नाल्याचे तोंड अरुंद होत जाते.

परिणामी पावसाळ्यात वरच्या बाजूला पाण्याचा प्रवाह जितका अधिक असतो, त्यापेक्षा कितीतरी पटींनी पाण्याचा प्रवाह मंदावतो. त्यामुळे वरच्या बाजूला म्हणजे मेनरोडवरील महापालिका मुख्यालयाच्या मागील बाजूने आलेल्या सरस्वती नाल्यात पाण्याचा फुगवटा तयार होऊन नाल्यातील पाणी उसळी घेते.

परिणामी बाहेर येऊन तळे साचते. सराफ बाजार, दहिपूल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. दरवर्षी अशाची परिस्थिती निर्माण होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने आयुक्त रमेश पवार यांनी सरस्वती नाला पुढे ज्या भागात मिळतो, त्या भागापासून ते मुंबई नाका या दरम्यान पायी प्रवास करून नाल्याची पाहणी केली.

ड्रेनेजच्या तोंडावर बॉटल नेक म्हणजे नाला अरुंद होत असल्याचे निदर्शनास आले. सरस्वती नाल्यावर गेट तयार करून पावसाळ्यात ते पाणी रुंद नलिकेच्या माध्यमातून गोदावरीकडे वळविले जाणार आहे. जेणेकरून फुगवटा तयार होऊन पाणी साठणार नाही.

बांधकाम व ड्रेनेज विभागाने तातडीने गेट बसविण्याच्या सूचना आयुक्त पवार यांनी दिल्या. दुसरीकडे स्मार्टसिटी कंपनीकडूनदेखील गावठाणातील १३१ रस्त्यांची शिल्लक राहिलेली कामे पूर्ण झाल्यानंतर सराफ बाजारातील पाण्याचा निचरा लवकर होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सराफ बाजार व दहिपूल भागाला दरवर्षी पडणारा पाण्याचा वेढा कायमस्वरूपी सैल होणार आहे.

Rainwater drainage scheme Latest Marathi News
Nashik : जिल्हा बँकेतर्फे 387 कोटींचे पीककर्ज 70 टक्के वाटप

"सरस्वती नाल्याची पाहणी केल्यानंतर बॉटल नेकमुळे फुगवटा तयार होऊन वरच्या बाजूला नाल्यातील पाणी बाहेर येते. त्यामुळे पावसाळ्यात नाल्याचे गेट बंद करून ते पाणी पुढे रुंद मार्गाने काढले जाईल."

- रमेश पवार, आयुक्त, महापालिका.

Rainwater drainage scheme Latest Marathi News
आधी संरक्षक भिंत, त्यानंतरच बांधकाम परवानगी; नगररचना विभागाकडून नोटिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.