America Khandoba Idol : अमेरिकेतही गुंजणार येळकोट येळकोट चा गजर...!

gaurav ghode submitted proposal to erect an idol of Khandoba in america nashik news
gaurav ghode submitted proposal to erect an idol of Khandoba in america nashik newsesakal
Updated on

America Khandoba Idol : अमेरिकेतील महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागातील भाविकांच्या आग्रहास्तव तेथील टेनेसी प्रांतातील चट्टानूगा भागातील सनातन मंदिरात खंडोबाची मुर्ती स्थापन करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला आहे. (gaurav ghode submitted proposal to erect an idol of Khandoba in america nashik news)

अमेरिकास्थित नीलेश गुणवंते यांच्या माध्यमातून श्री. घोडे यांच्या प्रस्तावास मान्यता मिळण्याची शक्यता असून लवकरच अमेरिकेतील भारतीयांना खंडेरायाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध होवू शकेल.

पुणे येथील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौरव घोडे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील श्री खंडेराव महाराजांच्या अनेक मंदिरांचे नूतनीकरण केले आहे. प्रतिष्ठानने जेजुरी, पंचलिंगेश्‍वर मंदिर, सोलापूर, नेवासा, येरमाळा आदी ठिकाणच्या मंदिरांच्या नुतनीकरणात सहभाग घेतला आहे.

पुणे येथील ओढा कॉलनीत सामान्य कुटुंबात गौरव घोडे यांचा जन्म झाला. परिस्थिती खूपच हालाकीची असली तरी त्यांचे वडील, आजी व कुटुंबीय खंडोबाची नित्य सेवा करतात. आजारपणात स्वामींनी खंडोबा रूपात दर्शन व भंडारा दिल्याने अंथरुणाला खिळलेली आई ठणठणीत बरी झाल्यापासून वडिलांनी ‘श्री स्वामी ओम मल्हारी’ या मंत्राचा जप करण्यास सुरवात केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

gaurav ghode submitted proposal to erect an idol of Khandoba in america nashik news
Sakal Exclusive : सावधान! येथे श्रमदान करायला येतात मृत मजुर...!

वडिलांनी दाखवलेल्या मार्गाने गौरव घोडे धार्मिक काम करत आहेत. महाराष्ट्रातील खंडित झालेल्या मुर्त्या व मंदिरे यांची वज्रलेप तसेच मंदिर दुरुस्तीची कामे श्री. घोडे व त्यांचे सहकारी निःस्वार्थ व विनामूल्य करतात. हिंदू देव देवतांची मंदिरे, मुर्त्या सुस्थितीत असाव्यात या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.

महाराष्ट्रातील विविध मंदिरांबरोबरच कर्नाटकातील यादगीर, मैलापुर, मल्लया येथील तुप्पासिह खंडोबा मंदिर, वीरभद्रेश्वर मंदिर व हेगडे प्रधान मंदिर येथील वज्रलेप मंदिर दुरुस्तीची कामे केली. अंतापूर येथील श्री शंकर महाराजांचे शिवलिंग व रुद्राक्ष माळ श्री. घोडे यांच्याकडे नुकतीच सुपूर्द करण्यात आली.

अमेरिकेतील महाराष्ट्र, कर्नाटक आदी भागातील भाविकांच्या आग्रहास्तव कुळधर्म, कुळाचार व कुलदैवत मल्हारी मार्तंड (खंडोबा) मूर्ती सनातन मंदिर चट्टनूगा अमेरिका येथे स्थापन होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

gaurav ghode submitted proposal to erect an idol of Khandoba in america nashik news
Women ST Bus Driver : नाशिक बसचे स्टेअरींग पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती!

कर्नाटकमध्येही सन्मान

गौरव घोडे यांनी कर्नाटकातील मैलापूर मध्ये (जि. यादगीर) तुप्पाशीह मल्लयाला वीरभद्रेश्वर आणि हेगडे प्रदान मंदिरातील नूतनीकरण कार्य केले. या कामाबद्दल मैलापूर काँग्रेसचे यादगीर जिल्हाध्यक्ष भिमाने मेटी यांच्या हस्ते श्री मल्हारभक्त पुरस्काराने गौरव घोडे यांना सन्मानित करण्यात आले आहे.

"श्री खंडोबाचा आशीर्वाद, आई, वडील आणि व्हीएचटीएल ग्रुपचे संचालक बालाजी राव यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर ही कामे करू शकलो. यापुढेही पुरातन मंदिरांचे संगोपन व नूतनीकरण करण्याचे काम सुरुच राहील." - गौरव घोडे, पुणे

gaurav ghode submitted proposal to erect an idol of Khandoba in america nashik news
Nashik News : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामात जिल्ह्यात 351 कोटींचे कर्जवाटप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.