Nashik News : उद्योजक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा : गीतांजली किर्लोस्कर

विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यशस्वी होण्यासाठी जागतिक स्तरावर स्पर्धा करावी लागेल.
Eminent entrepreneurs present at Brahmin Business Network Global International Conference on Sunday.
Eminent entrepreneurs present at Brahmin Business Network Global International Conference on Sunday.esakal
Updated on

Nashik News : विविध क्षेत्रांतील यशस्वी उद्योजक हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. यशस्वी होण्यासाठी जागतिक स्तरावर स्पर्धा करावी लागेल. त्यासाठी काही घटक अतिशय गंभीर आहेत. जर आपण गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले नाही, तर भारताच्या पुढील दहा वर्षांच्या विकासात आपण यशस्वी होऊ शकणार नाही.

भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनू पाहत आहे. (Geetanjali Kirloskar statement of Entrepreneurs are backbone of country economy nashik news)

पुढची दहा वर्षे उद्योजक, एसएमई भारताच्या वाढीला हातभार लावणार आहेत, असे प्रतिपादन किर्लोस्कर सिस्टम्स प्रा. लि.च्या चेअरपर्सन आणि एमडी गीतांजली किर्लोस्कर यांनी केले. ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (बी बी एन जी) तर्फे इंटरनॅशनल बिझनेस कॉन्फरन्स परिवर्तनची आठवी आवृत्ती रविवारी (ता.४) नाशिकमध्ये पार पडली. गोखले शिक्षण संस्थेच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला.

यात एक हजार उद्योजक सदस्यांचा सहभाग होता. मंत्रोच्चारात मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. गीतांजली किर्लोस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडचे संचालक विश्वास पाठक, डॉ अशोक जोशी, योगेंद्र पुराणिक, उदय निरगुडकर, आनंद गानू, डॉ विजय जोशी, विवेक देशपांडे, शेफ विष्णू मनोहर या मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती.

Eminent entrepreneurs present at Brahmin Business Network Global International Conference on Sunday.
Nashik News : शेतकरी, कष्टकर्यांसाठी गोळी मारली असती तर केलं असतं स्वागत : आ. बच्चू कडू

डॉ. अशोक जोशी यांनी प्रमुख भाषण करताना स्वच्छ आणि हरित ऊर्जेच्या भविष्याचे विवेचन केले. तसेच आगामी काळात हरित ऊर्जेकडे वळण्याचे महत्त्व सांगितले. जागतिक व्यवसायातील संधी, इन्फ्रा बिझनेस, मीडिया मार्केटिंग आणि ब्रँडिंग या विषयांवर बीटूबी सत्रे आयोजित केली होती.

अनेक पेटंट आपल्या नावावर असलेले शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ शुक्ला व एड्स रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी व्यापक कार्य करणाऱ्या सीमा किणीकर यांना मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पाच उद्योजकांना उद्यम कौस्तुभ पुरस्कार प्रदान करण्यात आले. आर्किटेक्ट प्रज्ञा पोंक्षे (मुंबई), कुमार काळे (नागपूर), रवळनाथ शेंडे (कराड), गोविंद झा (नाशिक) आणि डॉ. रणजित जोशी (नाशिक) यांना उद्यम कौस्तुभ पुरस्कार प्राप्त झाला.

बीबीएनजीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले. यावेळी मान्यवरांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. या वेळी मंचावर बीबीएनजीचे उपाध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, सरचिटणीस अरविंद कोऱ्हाळकर, परिवर्तन परिषदेचे प्रमुख डॉ. अभिजित चांदे, सहसचिव महेश देशपांडे उपस्थित होते. परिषदेदरम्यान आयोजित केलेल्या बीटूबी सत्रात सुमारे २५ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. यावेळी काही सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

Eminent entrepreneurs present at Brahmin Business Network Global International Conference on Sunday.
Nashik News : मोसम नदीतून काढला 30 टन कचरा; स्वच्छता मोहीम महिन्यात दोनवेळा राबवणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.