Uddhav Thackeray Nashik Visit : उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महाअधिवेशन; आज गोदा आरती

नाशिकमध्ये १९९५ मध्ये अधिवेशन घेऊन ‘दार उघड, बये दार उघड’ अशी गर्जना करणाऱ्या शिवसेनेने बदलत्या राजकीय संदर्भांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नाशिकमध्येच अधिवेशन घेण्याचे निश्चित केले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal
Updated on

Uddhav Thackeray Nashik Visit : नाशिकमध्ये १९९५ मध्ये अधिवेशन घेऊन ‘दार उघड, बये दार उघड’ अशी गर्जना करणाऱ्या शिवसेनेने बदलत्या राजकीय संदर्भांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा नाशिकमध्येच अधिवेशन घेण्याचे निश्चित केले.

त्याची सुरवात सोमवार (ता. २२)पासून होत आहे. (General Conference in presence of Uddhav Thackeray in nashik news)

सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिर दर्शन आणि गोदा आरती होईल. तत्पूर्वी, भगूर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या स्मारकालाही श्री. ठाकरे भेट देणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महाअधिवेशन होत असून, यासाठी राज्यभरातून जवळपास एक हजार ७०० लोकप्रतिनिधी नाशिकमध्ये येणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्‍घाटन व मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल. या कार्यक्रमासाठी देशभरातून तीन हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांना विलंबाने निमंत्रण देण्यात आले, त्यामुळे ते अयोध्येला न जाता येथील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शन घेतील.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Aurangabaad Visit : ठाकरेंचा औरंगाबाद दौरा आणि राजकीय गणित

मंगळवारी (ता. २३) शिवसेना पदाधिकाऱ्यांचे महाअधिवेशन होत आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील सातपूर येथील डेमोक्रसी हॉटेलमध्ये महाअधिवेशन होईल. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाचला नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर व राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर तोफ डागतील.

खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई हे नियोजन करीत आहेत. पंचवटीतील आर. पी. विद्यालयाच्या प्रांगणात १९९५ मध्ये शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले होते, त्या अधिवेशनाच्या समारोपाला ‘दार उघड, बये दार उघड’ हा गोंधळाचा कार्यक्रम झाला. यात जगदंबेला सत्तेसाठी साकडे घालण्यात आले, त्यानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा नाशिकमध्येच अधिवेशन होत असल्याने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे.

असे आहेत ठाकरेंचे कार्यक्रम

सोमवारी (ता. २२) दुपारी चारला भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देतील. सायंकाळी सहाला पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन व महापूजा. साडेसहाला गोदा आरती व उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुरोहितांचा सत्कार होईल. मंगळवारी (ता. २३) सकाळी दहाला सातपूर येथील डेमोक्रसी हॉटेलमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन, साडेदहा ते दुपारी दोनपर्यंत राज्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे महाशिबिर व सायंकाळी सहाला कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होईल.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Aurangabad Visit :उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर कपिल पाटील यांची टीका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.