Ayodhya Ram Mandir : जगातील 60 देशांमध्ये ‘रामलल्लाचा गजर’ : महामंत्री मिलिंद परांडे

तब्बल पाचशे वर्षांनंतर अयोध्येच्या राममंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal
Updated on

Ayodhya Ram Mandir : तब्बल पाचशे वर्षांनंतर अयोध्येच्या राममंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. भारत देशासह विश्व हिंदू परिषदेचा संपर्क असलेल्या तब्बल ६० हून अधिक देशांत हा उत्सव साजरा केला जाणार आहे.

देशातील ५ लाख मंदिरांमध्ये तसेच २० कोटी घरात हा श्रीराम उत्सव साजरा होईल. मंदिर वही बनायेंगे हा संकल्प आता पूर्ण झाला आहे. (General Minister Milind Parande statements Ramlala darshan in 60 countries of world nashik news)

आता मंदिर भव्य बनायेंगे हा संकल्पही येत्या दोन वर्षात पूर्ण केला जाणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील निमंत्रण दिल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. शंकराचार्य संकुलात मंगळवारी (ता.९) झालेल्या पत्रकार परिषदेत परांडे यांनी प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सविस्तर विवेचन केले.

श्री.परांडे म्हणाले की, या उत्सवांद्वारे, विहिंप सर्वच लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. परिषदेच्या समर्पण अभियानात १२ कोटी ७४ लाख भारतीयांपर्यंत पोहचता आले होते. आता प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी २० कोटी भारतीयांपर्यंत पोहोचणार आहोत. यासाठी १ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान विशेष अभियानदेखील राबविले जात आहे.

‘पाचशे वर्षांच्या वनवासा’ नंतर प्रभू श्रीराम स्वगृही परतत आहेत. त्यामुळे देशातील पाच लाख मंदिरांत यानिमित्ताने उत्साह साजरा केला जाणार आहे. देशात दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आफ्रिकन, दक्षिण अमेरिकन, इंडो-बर्मीज, मंगोलियन आणि युरोपियन देशातील हिंदू सहभागी होणार आहे.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Shri Ram Mandir : विशेष निमंत्रितांना निमंत्रणपत्रिका पोहोचल्या

दिडशे संप्रदायाच्या प्रमुखांसह महाराष्ट्रातील ३५५ साधू- संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित केले आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनाही आमंत्रित केले आहे. समाजातील सर्व वर्ग, सर्व भाषा, सर्व जाती, सर्व पंथ, संप्रदाय या सर्वांनी श्रीरामरायांकरिता, त्यांच्या मंदिराच्या निर्मितीकरिता प्रचंड योगदान दिले आहे.

२३ जानेवारीपासून मंदिर भाविकांना खुले होणार आहे. २७ जानेवारीपासून विहीपचे कार्यकर्ते टप्या टप्प्याने अयोध्येत दाखल होऊन दर्शन घेतील. महाराष्ट्रातील दहा हजार कार्यकर्त्यांना नेण्याचे नियोजन केले आहे. २१ फेब्रुवारीपर्यंत हे दर्शन होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे नाशिक विभागमंत्री अनिल चांदवडकर, शहर विभाग मंत्री योगेश बाविस्कर, योगेश लोमटे आदी उपस्थित होते.

रामनवमीला सूर्याची किरणे मूर्तीवर

सद्यस्थितीला तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून, पुढील दोन वर्षांत इतर दोन मजल्यांचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत मंदिराची कलशस्थापना होईल. मंदिराच्या तळमजल्यावर श्रीरामांची मूर्ती असणार आहे.

Ayodhya Ram Mandir
Ram Mandir Ayodhya: "राम-हनुमान भाजपचे नेते नाहीत, अहंकारातून बाहेर पडा"; उमा भारती असं का म्हणाल्या?

दुसऱ्या मजल्यावर राम दरबाराची रचना करण्यात येणार आहे. मंदिराचे बांधकाम करताना सिमेंट आणि लोखंडाचा वापर पूर्णपणे टाळला आहे. तसेच रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील, अशा स्वरूपाची बांधणी करण्यात आली आहे.

प्रसिद्धीसाठी देव-देवतांची अवहेलना चुकीची

श्रीरामांचा विरोध करून कुणाचेही कल्याण होऊ शकत नाही. सद्यस्थितीला अनेक राजकीय नेते केवळ प्रसिद्धीसाठी हिंदू देवी-देवतांची अवहेलना करीत आहेत. याचा विचार निवडणुकीदरम्यान जनतेनेच करावा, असेही श्री. परांडे यावेळी म्हणाले.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir : राममंदिरासाठी सरस्वती देवींनी तब्बल ३२ वर्षे मौनव्रत केले धारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.