General Post Office : ‘जीपीओ’ कार्यालयाच्या वेळेत बदल अन् अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर

GPO Post Office nashik
GPO Post Office nashikesakal
Updated on

जुने नाशिक : जीपीओ टपाल कार्यालयाची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तशा सूचनादेखील वरिष्ठ कार्यालयाकडून जीपीओ कार्यालय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राप्त झाल्या आहे.

नागरिकांची यामुळे सोय होणार आहे, मात्र कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडणार आहे. यामुळे त्यांच्यात नाराजीचे सूर दिसून येत आहे. (General Post Office Changes in timings of GPO office and displeasure among officers employees nashik news)

नागरिकांच्या सुविधेसाठी जीपीओ टपाल कार्यालयाची वेळ १० जानेवारीपासून वाढण्याची शक्यता आहे. त्या आशयाच्या तोंडी सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राप्त झाल्या आहे. सध्या कार्यालयाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत अशी आठ तासांची आहे. ती वेळ सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत करण्यात येणार असल्याने कामाचे तास सुमारे १२ तास होणार आहे.

त्यानंतर सुमारे दोन तास कार्यालयीन काम होणार असल्याने कर्मचाऱ्यांना सुमारे १४ तास काम करण्याची वेळ येणार आहे. कार्यालयात पूर्वीपासूनच कर्मचारी संख्या अपुरी असल्याने कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा त्रास जाणवत आहे. त्यात १२ ते १४ तास कामाची वेळ झाल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा तर ताण वाढणारच आहे.

शिवाय त्यांच्या आरोग्यावरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयीन वेळ वाढविण्यात येत असल्याने त्याचे कर्मचारी अधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे. परंतु, असे करण्यापूर्वी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे कंपनी आणि खासगी कार्यालयाप्रमाणे दोन शिफ्टमध्ये कर्मचारी नियुक्त करावे. असे केल्यास कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही कमी होईल. नागरिकांना अधिक सुविधा मिळण्यास मदत होईल. अशी चर्चा कार्यालय आवारात होताना दिसून येत आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

GPO Post Office nashik
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लवकरच नाशिकच्या मैदानात!

पहिला प्रयत्न फसला

नागरिकांच्या सोयीसाठी टपाल कार्यालयाची वेळ वाढवण्याचा पहिला प्रयत्न गोळे कॉलनी टपाल कार्यालयात तीन महिन्यापूर्वी करण्यात आला होता. कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण आणि नागरिकांचा कमी प्रतिसादामुळे पहिला प्रयत्न फसला होता.

ते कार्यालय पुन्हा पूर्ववत करण्यात आले आले आहे. तसाच प्रयत्न सध्या जीपीओ टपाल कार्यालयात राबविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या ठिकाणी कसा प्रतिसाद मिळतो ते येणाऱ्या दिवसात समजेलच.

युनियन पदाधिकारी घेणार वरिष्ठांची भेट

जीपीओ टपाल कार्यालयाची वेळ वाढवण्याचा निर्णय विचाराधीन आहे. यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता कर्मचारी संख्या वाढवण्यापासून ते कार्यालयीन वेळ संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात यावा. याबाबत टपाल कार्यालयातील युनियनचे पदाधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत चर्चा करणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

GPO Post Office nashik
Jindal Fire Accident : ‘जिंदाल’ विरुद्ध कारवाईसाठी ‘डिश’ Action Mode वर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.