MVP Annual Meeting : आर्थिक शिस्‍तीतून ‘मविप्र’ची शाश्‍वत वाटचाल : ॲड. ठाकरे

General Secretary Nitin Thackeray speaking at the Annual General Meeting of MVP.
General Secretary Nitin Thackeray speaking at the Annual General Meeting of MVP.esakal
Updated on

MVP Annual Meeting : ‘मविप्र’ संस्थेच्या यापूर्वीच्‍या सत्ताकाळात आर्थिक नियोजन नसल्‍याने संस्‍थेवर कर्जाचा बोझा वाढला होता. योग्‍य नियोजन न केल्‍याने संस्‍थेपुढे अनेक अडचणी वाढल्‍या.

आम्‍ही कुणालाही दोष न देता येत्या पाच वर्षांत चांगले काम करू, आर्थिक शिस्‍तीतून संस्‍थेची शाश्‍वत वाटचाल सुरू राहील, अशी ग्‍वाही मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी दिली.

तज्‍ज्ञ संचालक नियुक्‍ती तसेच अमृता व प्रणव पवारांचा कोरोनायोद्धा पुरस्‍काराने सन्‍मानित करण्याच्‍या गतवार्षिक सभेतील ठराव रविवारी (ता. १०) झालेल्या १०९ व्‍या वार्षिक सर्वसाधारण सभेत नामंजूर करण्यात आला. (GEneral Secretary Adv Thackeray statement at MVP Annual Meeting Sustainable progress of MVP through financial discipline nashik)

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्‍या ‘मविप्र’ संस्‍थेच्‍या वार्षिक सभेच्‍या अध्यक्षस्‍थानी संस्‍थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले होते.

सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्‍वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी यांच्‍यासह डी. बी. मोगल व अन्‍य पदाधिकारी, संचालक तसेच माजी सभापती माणिकराव बोरस्‍ते, माजी अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आदी उपस्‍थित होते.

अध्यक्ष डॉ. ढिकले यांनी स्‍वागत केले. संचालक ॲड. संदीप गुळवे यांनी शोकप्रस्ताव मांडला. यानंतर ॲड. ठाकरे यांनी कामकाजाचा लेखाजोखा मांडला. ॲड. ठाकरे म्‍हणाले, की गरज नव्‍हती तिथे यापूर्वीच्‍या काळात खर्च झाल्‍याने संस्‍थेचे आर्थिक नुकसान झाले आहे.

मात्र आम्ही पदभार स्‍वीकारल्‍यानंतर एक वर्षाच्‍या काळात विक्रमी कर्जफेड करताना विकासकामांचे योग्‍य नियोजन करत असल्‍याने आर्थिक बोझा वाढलेला नाही. आठ महिन्‍यांत संस्‍थेच्‍या १०६ शाळांचे सरकारी ऑडिट झाले आहे.

सभेपुढे विविध विषय मांडण्यात आले. यामध्ये मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याच्‍या विषयावर चर्चा करताना काही सभासदांनी गतसभेतील काही ठरावांना विरोध केला.

कार्यकारिणीवर तज्‍ज्ञ संचालकांनी नेमणूक करण्याचा तसेच कोरोनाकाळात सामाजिक योगदानाची दखल घेत आर्किटेक्‍ट अमृता पवार आणि प्रणव पवार यांचा कोरोनायोद्धा पुरस्‍काराने सन्‍मान करण्याच्‍या ठरावाला विरोध केल्‍याने हे दोन्‍ही ठराव नामंजूर करण्यात आले.

संस्‍थेचा २०२२-२३ चा अहवाल वाचून मंजूर करणे, मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांचे विभागवार एकत्रित खर्च उत्‍पन्न पत्रके व ताळेबंद पत्रके यांना मंजुरी देण्याचा ठराव मंजूर झाला.

निफाडमध्ये सर्वांत जास्‍त कामे

ॲड. ठाकरे म्‍हणाले, की आठ महिन्यांत सर्वच तालुक्‍यांमध्ये विकासकामांवर भर दिला आहे. त्‍यातही निफाडला सर्वांत जास्‍त कामे केली आहेत. एकवेळ चांदवडचे एखादे काम मागे ठेवू. पण निफाडच्‍या कामांना प्राधान्‍य देणार असल्‍याचे आश्‍वासन त्‍यांनी दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

General Secretary Nitin Thackeray speaking at the Annual General Meeting of MVP.
Gurumauli Annasaheb More: पर्जन्यसुक्ताद्वारे वरुणराजास साकडे घाला : गुरुमाउली यांचे आवाहन

स्वायत्ततेस विरोधापासून विस्‍ताराच्‍या सूचना

निवडणुकीस सामोरे जाताना श्‍वेतपत्रिका काढण्यासह बांधकाम व जमीन खरेदीबाबत चौकशी अहवालाबाबतचा मुद्दा संतोष गडकळ यांनी उपस्‍थित केला. डॉ. विलास बच्‍छाव म्‍हणाले, की २००४ मध्ये संस्‍थेच्‍या स्‍वायत्ततेचा विषय सभेपुढे आला होता.

परंतु विद्यापीठाशी संलग्‍न राहिल्‍यावरच शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता टिकेल, या विचारातून हा प्रस्‍ताव तेव्‍हा फेटाळला. त्‍यामुळे संस्‍थेच्‍या स्‍वायत्ततेबाबत पुनर्विचार

करण्याची सूचना त्‍यांनी मांडली. भूषण धनवटे यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्‍या सत्‍काराचा व मराठा आरक्षणाचा ठराव करण्याची सूचना केली. दिलीप धारराव यांनी वडनेर गावात अभिनव शाळेसाठी इमारतीची सूचना मांडली.

आत्मीयता व सन्‍मानाने पदाधिकारी व सभासदांनी कामकाज करण्याचा सल्‍ला माणिकराव बोरस्‍ते यांनी दिला. उद्धव देवरे यांनी करंजाडच्‍या जनता विद्यालयास ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे’ नाव देण्याची सूचना केली.

डॉ. सुरेश पाटील यांनी शहरी, ग्रामीण भागात रुग्‍णालयाच्‍या ओपीटी सुरू करण्याची सूचना मांडली. गिरणारेमध्ये वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रस्‍ताव सादर करण्याबाबत पुंडलिक थेटे यांनी सूचित केले.

सभेसाठी सभागृह अपुरे...

सभासदांच्‍या प्रतिसादाने सभागृह गच्च भरले होते. त्‍यामुळे अनेक सभासदांना व्‍यासपीठाच्‍या दोन्‍ही बाजूंना तसेच सभागृहाच्‍या मागील भागात उभे राहाण्याची वेळ आली. काहींनी मनोगतातून ही बाब बोलूनही दाखविली.

त्‍यावर उत्तर देताना पंधराशे क्षमतेचे सभागृह वाहनतळाच्‍या जागेवर उभारणार असल्‍याचे ॲड. ठाकरे यांनी सांगितले. दरम्‍यान, महिला सदस्‍यांची संख्या तोकडी होती.

ॲड. ठाकरे यांनी मांडलेले ठळक मुद्दे

- २०२३-२४ साठी संस्‍थेचे ९९१ कोटी ६८ लाखांचे अंदाजपत्रक

- २९ कोटी २१ लाखांचे कर्ज फेडले, सध्या ३५ कोटी ७४ लाखांचे कर्ज

- ‘यूजीसी’कडून एक कोटी ८३ लाखांचे अनुदान

- संस्‍थेच्‍या खेळाडूंना स्‍पर्धांत ८१ सुवर्ण, ६० रौप्‍य, ६५ कांस्‍यपदके

- विनाअनुदानित तत्त्वावरील सेवकांना पगारवाढ

- भाडेतत्त्वावरील ३८ शाळांच्‍या इमारतींसाठी प्रयत्‍नशील

- सभासद पाल्‍यांच्या नोकरीसाठी प्‍लेसमेंट सेलद्वारे प्रयत्‍न

- ‘आयसर’सोबत ऐतिहासिक करार, शिक्षकांच्‍या प्रशिक्षणाचा लाभ

- २२ बॅचद्वारे आत्तापर्यंत तीन हजार ३४२ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण

- विजेबाबत स्‍वयंपूर्णतेसाठी सोलर प्रकल्‍प उभारणीचा प्रयत्न.

- संस्‍थेमार्फत परीक्षा सेलची करणार स्‍थापना

General Secretary Nitin Thackeray speaking at the Annual General Meeting of MVP.
Nashik News: जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेतर्फे यंदा 5. 44 टक्के लाभांशाची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.