Nashik : आता व्हाट्सॲपवर मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड

Digilocker & Whatsapp
Digilocker & Whatsapp esakal
Updated on

कनाशी (जि. नाशिक) : सरकारने डिजिलॉकर सर्व्हीस (Digilocker Service) व्हाट्स ॲपवर (Whatsapp) उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे फक्त एका नंबरवर मॅसेज पाठवून पॅनकार्ड (Pancard) किंवा सर्व कागदपत्रे व्हाट्स ॲपमध्ये डाउनलोड करू शकता. त्यामुळे मूळ कागदपत्रे सोबत बाळगणे गरजेचे राहणार नाही. (Get Driving License PAN Card now on WhatsApp Nashik News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजीलॉकर (डिजिटल लॉकर) लॉन्च केले गेले होते. डिजिलॉकरमुळे आपली सर्व कागदपत्रे आपल्या मोबाईलमध्ये सुरक्षित राहतात. गरज पडल्यास ते दाखवू शकतो. हार्ड कॉपी- कागदी प्रिंट- जवळ बाळगण्याची गरज नसते.

Digilocker & Whatsapp
Nashik : कुत्ता गोळी विकणाऱ्या मेडिकलवर कारवाई करण्याची मागणी

या सुविधेमुळे नागरिकांना कुठेही जाताना त्यांचे सर्व महत्वाचे कागदपत्र डिजीटल लॉकरमध्ये (मोबाईलमध्ये) ठेवता येणार आहेत. ज्यामुळे या कागदपत्रांची मुळ प्रत सोबत बाळगायची आवश्यकता नसल्याने ते खराब किंवा गहाळ होण्याची भीती देखील दूर होण्यास मदत मिळाली आहे. नागरिकत्व, शैक्षणिक आणि आर्थिक स्वरूपाची कागदपत्रे जसे एसएससी व एचएससी मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड, कोविड लसीकरण प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले आदी आपण डिजिलॉकरमध्ये साठवून ठेवू शकतो. तसेच, तुम्ही तुमची शैक्षणिक कागदपत्रे व ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र (पुरावा) येथे स्कॅन करुन अपलोड पण करू शकता. डिजिलॉकरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अधिकृत आधार कार्डची आवश्यकता भासते.

Digilocker & Whatsapp
द्राक्ष व्यापाऱ्याच्या गोदामाला आग लागून लाखांचे नुकसान

केंद्र सरकारने राज्य सरकारला ऑगस्ट २०१८ मध्ये ‘डिजिटल लॉकर’ अर्थात ‘डिजी लॉकर’ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी मागणी केल्यास मूळ प्रतीऐवजी मोबाइल डिजी लॉकरमधील ड्राइव्हिंग लायसन्स व इतर कागदपत्रांची प्रतिमा ग्राह्य धरण्यात यावी, असे निर्देश केंद्र सरकारने १८ ऑगस्ट २०१८ रोजी रस्ते वाहतूक मंत्रालयाला दिले आहेत. गुगल प्ले स्टोअर वरून DigiLocker आपल्या मोबाईलमध्ये स्थापित करू शकता. १०० मिलियन नागरिकांनी डिजिलॉकरसाठी नोंदणी केलेली आहे.

असे करा डाउनलोड
तुम्हाला फक्त +९१ ९०१३१५१५१५ या नंबरवर Hi, Namaste किंवा Digilocker हा व्हाट्स ॲप मॅसेज करायचा आहे. डिजिलॉकर खाते असल्यास फक्त आपला आधार नंबर, आलेला OTP टाकून आपण ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड लगेच मिळवू शकतो. थोडक्यात डिजिलॉकरमध्ये तुम्ही आधीच अपलोड केलेली सर्व कागदपत्रे तुम्ही आता व्हाट्स ॲपवरून डाउनलोड करु शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()