Nashik News : मल्हारखानच्या जागेवर घरकुल योजना; परवानगी न घेता जागेची विक्री!

Gharkul Scheme
Gharkul Schemeesakal
Updated on

नाशिक : अशोकस्तंभ परिसरातील मल्हारखान झोपडपट्टीच्या जागेवर घरकुल योजना साकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्याच्या सूचना महसुल मंत्री बाळासाहेब विखे- पाटील (Balasaheb Vikhe-Patil) यांनी दिल्या.

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी जागेसंदर्भात लक्षवेधी सादर केली होती. (Gharkul scheme on Malharkhan site Sale of premises without permission nashik news)

विधानसभेत झालेल्या चर्चेच्या निमित्ताने आमदार फरांदे म्हणाल्या, मल्हारखान येथील जागेचे भूमापन क्रमांक ६७० ही शासकीय जागा असताना या जागेला वारस लावून जागेची विक्री करण्यात आली. विक्रीची नोंद शासकीय दप्तरात करण्यात आली.

यामुळे ही जागा शासन जमा करून या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सर्वांसाठी घरे या धोरणानुसार हक्काची घरे द्यावी अशी मागणी केली. शंभर वर्षापासून शासनाची जमीन खासगी व्यक्तीच्या नावे झालेली असताना महसूल विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत होता. शंभर वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार फरांदे यांनी केली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Gharkul Scheme
Rain Damage Crops : वीस मिनिटांच्या गारांनी कष्टावर फिरवले पाणी! आता कर्ज फेडायची चिंता

उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, भूमापन क्रमांक ६७०/अ जागा पॉवर हाऊस साठी श्री. भागवत यांना देण्यात आली. या जागेची विक्री व वारसही लागले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत शर्तभंग झाली आहे. तसेच सर्वे नंबर ६७०/ब ही जागा शंकर पांडू भिल व इतरांना देण्यात आली होती. पूर्वपरवानगी न घेता सदर जागा विक्री झाल्याने शर्तभंग झाली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा शासन जमा करण्यात येतील.

सर्वांसाठी घरे योजना

मल्हारखान जागेवर सर्वांसाठी घरे योजना राबविता येईल का, या प्रश्नावर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.

Gharkul Scheme
Farmer News: अवकाळी अन् गारपीटीनंतर बळीराजावर आश्वासनांचा पाऊस; नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.