Gharkul Yojana Scam : घरकुल योजनेत जुनेच घर दाखवून अनुदानही लाटले; अनियमिततेची चौकशी सुरू

Gharkul Yojana
Gharkul Yojana sakal
Updated on

Gharkul Yojana Scam : येवला तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामात काही गावात मृत मजूर कामावर दाखवून गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण ताजे असताना संबंधित गावांत जुनेच घर घरकुल योजनेत दाखवून लाभ घेतल्याचे पुढे येते आहे.

पुरणगाव (ता.येवला) येथील ग्रामपंचायत सदस्यानेच तक्रार केल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. (Gharkul Yojana Scam subsidy also waved by showing old house investigation into irregularities underway nashik news)

पुरणगाव (ता. येवला) येथे शासनाच्या रोजगार हमी योजनेंतर्गत तानाजी ठोंबरे वस्ती ते उत्तम ठोंबरे वस्ती रस्ता खडीकरणाच्या १ एप्रिल २०२२ ते ६ एप्रिल २०२२ दरम्यान झालेल्या कामावर हजर असल्याचे दाखवलेल्या काही मजुरांचा दोन वर्षे आधीच मृत्यू झाल्याचे पुढे येते आहे.

मात्र त्यानंतरही संबंधितांच्या जळगाव नेऊर येथील राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर १५९० रुपये जमा झाल्याचे पुढे आले आहे.

दोन वर्षापूर्वी नाशिकला एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालेल्या मजुराच्या नावावर मजुरी जमा करण्याच्या या प्रकरणाची जिल्हा यंत्रणेकडून चौकशी सुरु असताना आता त्याच गावात पंतप्रधान घरकुल योजनेत जुने घर दाखवून लाभ घेतल्याचे पुढे येत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gharkul Yojana
Nashik Crime: प्रसूतीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन; सातपूरच्या मायको हॉस्पिटलमधील प्रकार

याबाबत पुरणगाव येथील ग्रामरोजगार सेवकाच्या वडिलांच्या नावे घरकुल योजनेत घरकुल मंजूर आहेत. मात्र संबंधित घरकुलाचे काम न करता म्हणजेच जुने असलेले घर दाखवून लाभ घेतल्याची तक्रार आहे.

स्वतः ग्रामरोजगार सेवकाच्या घरातील कुटुंबीयांच्या बाबतच तक्रार असल्याने घरकुल योजना चौकशीच्या भोवऱ्यात सापडली आहे. पुरणगाव येथील रस्त्यांच्या कामांमध्ये अकुशल मजूर न वापरता मोठ्या प्रमाणात कामकाजात अनियमितता झाल्याच्या तक्रारी आहेत.

कामकाजात अनियमितता करीत शासनाची फसवणूक केल्याच्या सदस्य रामनाथ ठोंबरे यांच्या तक्रारीवरून प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरु झाली आहे.

Gharkul Yojana
Nashik News: मालेगावात प्रशिक्षणाच्या नावाखाली धार्मिक प्रचार! हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.