घोटीकरांची वणवण; गढूळ पाण्याने ‘फिल्टर प्लांट’च्या अडचणी

contaminated water
contaminated water esakal
Updated on

नाशिक : ऐन पावसाळ्यात घोटीकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती अन् धडपड करण्याची वेळ आली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे बंधाऱ्यात जमा झालेले गढूळ पाण्यामुळे ‘फिल्टर प्लांट’समोर घोटीकरांना शुद्ध पाणी देताना अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. यामुळे सर्वांना पाणी देता यावे म्हणून पालिका प्रशासनाला पाण्याची वेळ कमी करण्याची वेळ आली आहे. (ghoti citizens suffering for water crisis nashik latest marathi news)

दहा वर्षांमध्ये शहराच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. घोटी शहरातील प्रत्येक कुटुंबातील लोकांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनावर असल्याने सर्वांची गरज भागविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे.

घोटी शहरात सद्यःस्थितीत सहा वॉर्ड आहेत. शहरवासीयांना पाण्याचा सुरळीत पुरवठा व्हावा, यासाठी शहरात सुमारे १७० व्हॉल्व्ह कार्यरत आहे. प्रत्येक विभागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपालिकेतील पाच कर्मचाऱ्यांवर आहे. हे कर्मचारी रोटेशन पद्धतीनुसार घोटीकरांना पाणीपुरवठा करतात.

गढूळ पाण्याने नवे संकट

घोटीकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी असलेल्या फिल्टर प्लांटची क्षमता ही केवळ २० हजार लोकसंख्येपर्यंत मर्यादित आहे. शहराच्या लोकसंख्येत काही वर्षांत दुपटीने वाढ झाली असून, शहराचा विस्तारही झपाट्याने होत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरजदेखील वाढली आहे. या सर्वांचा ताण हा आपोआपच पाणी फिल्टर प्लांटवर आला आहे. यातच ९ ऑगस्टपासून आजपर्यंत घोटी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे दारणेला पूर आला आहे.

contaminated water
Ganeshotsav 2022 : बाप्पाच्या आगमनासाठी लाइटिंगचा झगमगाट

यामुळे मोठ्या प्रमाणात नदीत घाण वाहून आली आहे. यामुळे हे पाणी शुद्ध करून घोटीकरांना उपलब्ध करून देताना फिल्टर प्लांटवर अतिरिक्त ताण येत आहे. पाणी शुद्ध होण्यास जादा वेळ लागत आहे. यातच पुरामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे घोटीचा पाणीपुरवठा विस्कळित झाला होता.

अनधिकृत नळजोडणीचाही अडथळा

शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देताना ग्रामपालिका प्रशासनाची दमछाक होत आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता अनेक इमारतींची निर्मिती आणि शहरालगतचा भाग झपाट्याने विकसित होत आहे.

याठिकाणीही पाण्याची मोठी गरज आहे. यात अनेकांकडून अनधिकृत नळजोडणीदेखील केल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अशा अनधिकृत नळजोडणीवर ग्रामपालिकेकडून कारवाई करत दंड वसूल करून ते अधिकृत करण्यात येत आहे.

contaminated water
तुम्ही रस्त्यांवरून फिरत नाही का?; आयुक्तांचा ठेकेदारांना सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.