Nashik E-Bus : नाशिकला 100 पीएम ई- बसचे गिफ्ट

E-bus in (File Photo)
E-bus in (File Photo)esakal
Updated on

Nashik E-Bus : तीन लाख व त्यापेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम ई- बस सेवेअंतर्गत नाशिक शहराला शंभर बसचे गिफ्ट मिळाले आहे. (Gift of 100 PM E Bus to Nashik news)

२०११ च्या जनगणनेनुसार तीन लाख व त्याहून अधिक लोकसंख्येचे शहरे या योजनेत केंद्रशासित प्रदेश ईशान्य प्रदेश आणि पर्वती राज्यांमधील सर्व राजधानी शहरे समाविष्ट आहेत. या योजनेंतर्गत संघटित बससेवा नसलेल्या शहरांना प्राधान्य देण्याचे नियोजन होते.

त्याअंतर्गत पीएम बस सेवा सुरू करण्यात आली आहे. पीपी मॉडेलवर शहर बस ऑपरेशन वाढविण्यासाठी ही योजना आहे. यात केंद्राचा वीस हजार कोटींचा वाटा असून उर्वरित वाटा राज्यांना उचलावा लागणार आहे.

E-bus in (File Photo)
Jalgaon E Bus : जळगावच्या इ बससेवेला केंद्रांची मंजुरी; आमदारांकडून बस डेपो जागेचे पाहणी

महाराष्ट्रात कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक लातूर, नवी मुंबई, पुणे या शहरांना बस देण्याचे नियोजन आहे. नाशिक शहरासाठी या योजनेंतर्गत शंभर बसची घोषणा करण्यात आली आहे.

महापालिकेतर्फे सिटी लिंक कंपनीच्या माध्यमातून बससेवा चालवली जाते. सध्या अडीचशे बस शहरात सुरू आहेत. पीएम योजनेअंतर्गत आता शंभर बसची भर पडणार असल्याने नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यानिमित्ताने बळकट होणार आहे.

E-bus in (File Photo)
Nashik E Bus : ‘पीएम ई बस’ योजनेच्या माध्यमातून 100 इलेक्ट्रिक बस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.