Ginger Rate Hike : अद्रक चांगल्या भावासाठी गेल्या दहा वर्षापासून झगडत होते. १५ ते (Nashik News) २५ रुपये किलो दरम्यान विकल्या जाणाऱ्या अद्रकला चांगला भाव मिळण्यासाठी दशकाची वाट पहावी लागली. (Ginger has reached 100 rupees price in retail market nashik news)
पुरेसा भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी अद्रकपासून दूर गेले. मात्र यंदा अनेक कारणांनी उत्पादनात घट झाल्याने अद्रकचा तडका पाहायला मिळाला. सध्या घाऊक बाजारात ७० ते ७५ रुपये किलोने मिळणाऱ्या अद्रकने किरकोळ बाजारात शंभरी गाठली आहे.
जळगाव जिल्ह्यासह मराठवाड्यातून अद्रक राज्यभर विक्रीसाठी जात आहे. आगामी काळातील लग्नसराई पाहता किमान महिनाभर तरी भाव तेजीत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान बेंगळुरू येथून येणारा माल कमी झाल्याचा फटका देखील बसला आहे. याआधी अद्रकला पुरेसा भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नव्हता.
त्यामुळे अनेक शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळले. अद्रकच्या उत्पादनात सरासरी वीस टक्के घट झाल्याचे सांगितले जाते. गुजरातमध्येही अद्रकचे उत्पादन घटल्याने तेथील घाऊक व्यापारी चाळीसगाव भागात येऊन शेतकऱ्यांच्या बांधावर अद्रक विकत घेत आहेत.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
पंधरा दिवसापासून भावात लक्षणीय वाढ झाली आहे. दहा वर्षानंतर प्रथमच अद्रकचे दर वाढले असून किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोने मिळत आहे. बेंगळुरूहून मोठ्या प्रमाणावर अद्रक राज्यभर येत होते. मात्र स्थानिक बाजारपेठेतच बहुतांशी माल विकला जात असल्याने या भागातील अद्रकची आवक कमी झाली.
मालेगावच्या भाजीपाला बाजारात रोज १२ टन अद्रकची विक्री होत आहे. येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व घरगुती वापरासाठी अद्रक विक्री होते. खानदेशमध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्हा अद्रकचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
कसमादेसह इतर भागात त्याचे प्रमाण कमी आहे. या भागातील अद्रकला उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, गुजरात आदी राज्यातून मागणी आहे. सध्या राज्यात सर्वाधिक आवक कन्नड बाजारात असून रोज ३० टन माल येतो. मालाची उपलब्धता व मागणी यात मोठी तफावत असल्याने पंधरा दिवसापासून दरात वाढ झाल्याचे कन्नड येथील व्यापारी प्रकाश राऊत यांनी सांगितले.
"येथील बाजारात दहा वर्षात प्रथमच अद्रकचे दर वाढले आहेत. दरवर्षी अद्रकला भाव मिळत नव्हता. या वर्षी आवक घटली असून दर वाढले आहेत. अद्रकचा ७० टक्के माल शहरात विकला जातो." - पंकज खैरनार, श्री व्हेजिटेबल कंपनी, मालेगाव
"शेतकऱ्यांकडे महिनाभरापूर्वी अद्रकचा भरपूर माल होता. भाव वाढतील या आशेने सलग दोन वर्षापासून आले शेतात राखून ठेवले होते. महिनाभरापूर्वी ३५ रुपये किलोप्रमाणे विकावे लागले." - नईम नबी शेख, शेतकरी, तिखी (जि. संभाजीनगर)
अद्रकचे भाव असे
वर्ष ---- किलो दर (घाऊक)
२०१७- २५ रुपये किलो
२०१८- १५ रुपये
२०१९ - १३ रुपये
२०२०- १६ रुपये
२०२१ - २५ रुपये
२०२२ - २७ रुपये
२०२३- ७५ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.