नाशिक : राज्यात लवकरच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होईल त्याची सुरुवात काँग्रेसमध्ये दोन गट पडून झाल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगताना येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे भाकीत व्यक्त केले. (Girish Mahajan statement about Congress NCP will soon be Shiv Sena in state maharashtra politics nashik news)
नाशिक मध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, आत्ताच्या परिस्थितीमध्ये राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकत काँग्रेसमध्ये आत्ताच दोन पडले आहे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात एक गट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे.
त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसला कंटाळले आहे राज्यातील महाविकास आघाडीचे तीन तेरा वाजले असून कोण केव्हा बाहेर पडेल सांगता येत नाही महाविकास आघाडी मधील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था शिवसेनेसारखी होईल.
माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत झाले जेवढा मोठा गुन्हेगार तेवढे मोठे स्वागत हे आता परंपरा पडताना दिसत आहे. भाजप सरकार मध्ये सोडाचे राजकारण सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
त्यावर प्रतिक्रिया देताना सरकार सोडाचे राजकारण करत असते तर अनिल देशमुख व नवाब मलिक यांना इतक्या दिवस न्यायालयाने कोठडीत ठेवले नसते असे महाजन म्हणाले संजय राऊत बेताल पणे वक्तव्य करीत आहे.
त्यांचे सर्व काही प्रसिद्धीसाठी चालते महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक पत्रकारांचे हाल झाले आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नानार प्रकल्पाबाबत बोलावे व त्यानंतर पत्रकाराची हत्या व्हावी याचा काहीही संबंध नाही. भाजप सरकारच्या काळात दिवसाढवळ्या कोणी कायदा सुव्यवस्था मोडत असेल तर त्याला शिक्षा होणारच असे महाजन म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.