Girish Mahajan News : पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात; ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट

sharad pawar and girish mahajan
sharad pawar and girish mahajanesakal
Updated on

Girish Mahajan News : सन २०१४ पासून अनेक किस्से महाराष्ट्राच्या राजकारणात घडले आहेत. यात राष्ट्रवादी पक्षाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतरची अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधीदेखील ठरलेला होता.

या शपथविधीमागे शरद पवार यांचाच हात असल्याचा गौप्यस्फोट गिरीश महाजन यांनी आज येथे केला. ही गोष्ट शरद पवार नाकारू शकत नाही, शिवाय त्या वेळी आम्हाला पाठिंबा देण्याबाबतही शरद पवार आग्रही होते, हे देखील तितकेच सत्य असल्याचे महाजन यांनी सांगितले.

(girish mahajan statement about sharad pawar morning swearing nashik news)

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन सोमवारी (ता. ११) जिल्हा दौऱ्यावर होते. त्या वेळी महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर अनेक राजकीय नेत्यांनी यापूर्वीही गौप्यस्फोट केले आहेत.

यातच नाशिकमध्ये महाजन यांनी पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. २०१४ ते २०१९ शरद पवार यांनी आम्हाला पाठिंबा दिला नाही का? तर पवारसाहेबांनी सांगितले होते, तुम्ही काळजी करू नका, आम्ही पाठीशी आहे.

शिवसेना जेव्हा थोडी नाटक करायला लागली होती. तेव्हा २०१९ ची निवडणूक झाल्यावर त्यांनी चार-चार वेळा दिल्लीत मीटिंग केल्या होत्या. त्याचवेळी अजित पवार पहाटेच्या सुमारास गेले, भाजपची खेळी असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मात्र खरी गुगली शरद पवार यांनीच टाकल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी या वेळी केला.

अजित पवार म्हणाले त्याप्रमाणे राष्ट्रवादी पक्षाने भाजपला २०१४ मध्ये उघड पाठिंबा दिला. त्यांनी सांगितले म्हणून तर आम्ही दावा केला होता. हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. दिल्लीत जाऊन किती वेळा बैठका झाल्या.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sharad pawar and girish mahajan
Sharad Pawar: महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी सांगितला आकडा

आमच्या नेत्यांसोबत त्यांनी मंत्रिपदाच्या, पालकमंत्रीपदाच्या वाटाघाटी केल्या. आता ते या सर्व गोष्टींबाबत नाही म्हणून पडले आहे. मात्र अजित पवार म्हणत आहेत, ते खरे आहे. अजित पवार देखील त्या बैठकीला उपस्थित होते, हे शरद पवार नाकारू शकत नाही, असेही महाजन यांनी सांगितले.

पोलिसांकडून तपास सुरू

सातारा येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुणाला अस्थिरता माजवायची आहे, कुणाला दंगली घडवायच्या आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. जाणीवपूर्वक अस्थिरता कोण निर्माण करतंय, कोण खतपाणी घालत आहे, याचीही चौकशी पोलिस करत आहेत, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

तो ‘जीआर’ टिकणार नाही

राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा, ही मागणी कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. सरसकट कुणबी म्हणून आरक्षण दिल्यास ते न्यायालयात टिकणार नसून ते पहिल्याच दिवशी फेटाळले जाईल. त्यावर तोडगा काढण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे मंत्री महाजन यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठक होत असून, बैठकीत तोडगा निघावा यासाठीच प्रयत्न सुरू असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे, की त्यांनी उपोषण सोडावे, असेही महाजन यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वी जरांगे यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते, त्यात चर्चा झाली होती.

sharad pawar and girish mahajan
Sharad Pawar : अजित पवार अन् त्यांच्यासोबत गेलेले आमदार परत आल्यावर काय? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

सुरवातीस मराठवाड्यामधील मराठा समाज वेगळा आहे, असे त्यांनी सांगितले होते. मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज कुणबी मराठा झाला. आता ते मागणी करताहेत, की संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला द्यावा. हे कायद्याच्या चौकटीत बसणार नसून कोर्टातूनच आरक्षण घ्यावे लागेल.

त्यासाठी तत्काळ ‘जीआर’ काढावा. मात्र तत्काळ तशा स्वरूपातील जीआर काढला तर न्यायालयीन कसोटीवर तो टिकणार नाही. या सर्व गोष्टींवर अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांची मनःस्थिती चांगली नाही

२५ वर्षे यांनी काय, बाळासाहेबांनी कमळाबाईची पालखी वाहिली का?, तुमची स्वतःची पालखी वाहण्यासाठी तुम्हाला चार भोयीसुद्धा मिळत नाही. ९० टक्के शिवसेना आमच्या सोबत आहे. त्यामुळे ते काय बोलत आहे कळत नाही. कालच्या भाषेवरून मला वाटले त्यांची मनःस्थिती चांगली नाही. आमच्याकडे बोलण्यासाठी

दहा गोष्टी आम्ही बोलू शकतो. शारीरिक व्यंगावर हा असा दिसतो, तो तसा दिसतो आम्हीही बोलू शकतो, असे महाजन यांनी सांगितले. सामना पेपर हा फक्त आता पुसायच्या कामाचा राहिला आहे. त्याला महत्त्व देऊ नका. ४८ पैकी एक खासदार निवडून आणून दाखवा. राऊत यांना सुरक्षित मतदारसंघ शोधून निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान महाजन यांनी केले.

sharad pawar and girish mahajan
Sharad Pawar Video : जिथे काकांच्या सभा तिथेच पुतण्याचा आवाज; हा योगायोग आहे? की...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.