Girish Mahajan News: सन्मित्र मंडळाची 132 कुटुंबांना आर्थिक मदत : गिरीश महाजन

सन्मित्र मंडळाची वार्षिक सभा उत्साहात
Girish Mahajan statement Sanmitra Mandal financial assistance to 132 families nashik
Girish Mahajan statement Sanmitra Mandal financial assistance to 132 families nashikesakal
Updated on

Girish Mahajan News : आपल्या जनसंपर्कातून मंडळाची उद्दिष्टपूर्ती करणारे हे आमचे मंडळ अनेक गरजूंना मदत करत खऱ्या अर्थाने एक मित्र म्हणून सन्मित्र कार्य करत आहे.

१३२ कुटुंबांना मदत हे सामाजिक कार्य करताना आमचा मंडळ स्थापनेचा दूरदृष्टीकोन आज खऱ्या अर्थाने यशस्वी झाल्याचे मनस्वी समधान आहे, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन यांनी आपल्या मनोगतात केले. (Girish Mahajan statement Sanmitra Mandal financial assistance to 132 families nashik)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

३५ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या या मंडळाचे काम गेल्या तीन वर्षापूर्वी जी महामारी आली होती, तेथून प्रकर्षाने अधिक उपयुक्त जाणवले, गरजेतून जे निर्माण होते ते तात्कालिक असते आणि गरजेपुर्वी जे विचारात घेतले जाते ते दूरदृष्टीचे असते म्हणून या दूरदृष्टीला आमचा सलाम आहे असे प्रतिपादन अशोक सोनजे यांनी आपल्या मनोगतात केले.

लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळाच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

व्यासपीठावर संजय पाखले, दीपक मालपुरे, राजेश कोठावदे , सचिन कोठावदे, संजय महाजन, सुनील अमृतकर , डॉ. मकरंद राणे, मधुकर ब्राह्मणकर, ज्ञानेश्वर धामणे, संजय येवले, नीलेश मकर, सचिन बागड, प्रशांत शिरोडे ,विनोद दशपुते, देविदास कोठावदे , सुभाष येवला, डॉ.सुभाष ढोमने, चित्रा कोठावदे , डॉ.सुधाकर मालपुरे आदी उपस्थित होते.

प्रमुख अतिथी संजय पाखले, मंडळाचे संस्थापक मधुकर ब्राह्मणकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

सभेदरम्यान सन्मित्र आश्रयदाते सभासद म्हणून अजय सोनजे, संजय पाखले, शरद धामणे, योगेश नावरकर, संदीप महाजन, नितीन धामणे, संजय वाणी, चित्रा कोठावदे, सुभाष येवला, अशोक सोनजे, अनिल पोपट कोठावदे (कळवण) यांचा विशेष गौरव करण्यात आला.

सन्मित्र मंडळामध्ये विभागीय प्रतिनिधी म्हणून कळवण तालुका प्रतिनिधी अनिल अलई, दीपक वेढणे, हितेंद्र येवले (छत्रपती संभाजीनगर), अमोल मोराणकर, चंद्रकांत विखरणकर, कल्पेश धामणे, उदय राहुडे (मालेगाव), सुभाष नावरकर(पाचोरा), जयवंत बागड (पिंपळनेर), यांची प्रतिनिधी तर मंडळाचे लेखा परिक्षक म्हणून भूषण कोतकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Girish Mahajan statement Sanmitra Mandal financial assistance to 132 families nashik
ZP Payment Hike : जूनअखेरीस निवृत्तांना 1 जुलैची वेतनवाढ; ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला पत्र प्राप्त

यावेळी संजय येवले, ज्ञानेश्‍वर धामणे, सचिन बागड, नीलेश मकर, पंकज कोठावदे, दीपश्री मेणे, प्रशांत शिरूडे, अतुल देशमुख, डी.एन.कोठावदे, जितेंद्र येवले, प्रतिभा वाणी, प्रणाली बागड, किशोर सोनजे, नंदलाल धांडे, विशाल कोठावदे यांनी व इतर संचालकांनी निवृत्त सभासदांना सन्मानित केले. मनोज शिनकर,

गणेश येवला, भूषण सोनजे ,सुनील ब्राह्मणकर, सचिन अमृतकर, कमलेश कोठावदे, वैभव येवला, देविदास कोठावदे, विनोद दशपुते, वसंतराव येवलेकर, राजेश मालपुरे, सुभाष कोठावदे, चेतन सोनजे, रूपेश वरखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद व समाजबांधव उपस्थित होते. मेघा पाचपुते यांनी स्वागत गीत, सन्मित्र मंडळाचे संचालिका प्रतिभा वाणी व सचिन अमृतकर यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र येवले यांनी आभार मानले.

रुग्णापयोगी साहित्य भेट देण्याचा अनोखा संकल्प

श्याम पूरकर व नाना पूरकर यांनी आपल्या आईंच्या उत्तरकार्यनिमित्त नातेवाइकांना भेट वस्तू न देता समाजाची आरोग्यवाहिनी ठरलेल्या सन्मित्र मंडळास २७ हजार रुपये किमतीचे रुग्णापयोगी साहित्य भेट देऊन समाजमनासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे.

Girish Mahajan statement Sanmitra Mandal financial assistance to 132 families nashik
Nashik: सरकारी अन् स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी राज्यात दत्तक शाळा योजना; देणगीदारांना शाळेचे पालकत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.