नाशिक : राज्यात सत्तांतरण होऊन भाजपच्या (BJP) मदतीने शिंदे सरकार (Shinde Government) आल्यानंतर आता मंत्रिपदाचे वाटप होऊन नाशिकच्या पालकमंत्री पदावर कोण बसेल याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.
नाशिकमधून मंत्रिपद कोणाला मिळेल याबाबत साशंकता असली तरी पालकमंत्री पदावर मात्र गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचेच नाव आघाडीवर राहणार असून महापालिका (NMC) व जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्ताने (ZP Election) महाजन यांच्याकडेच पालकमंत्री पद सोपविण्याची मागणी भाजपमधूनच होत आहे. (Girish Mahajans name in lead for post of guardian minister nashik latest maharashtra political news)
सरकार स्थापनेला पंधरा दिवस उलटल्यानंतरही अद्याप मंत्री व खात्यांचे वाटप झाले नाही. आता वीस जुलै नंतर मंत्रिमंडळाची घोषणा होणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसाठी देखील रस्सीखेच सुरु झाली असून नाशिकच्या पालकमंत्री पदावर सध्या तरी गिरीश महाजन यांचाच दावा आहे.
नगरचे राधाकृष्ण विखे-पाटील, जळगावचे गुलाबराव पाटील या भाजप आमदारांचे नाव असले तरी महाजन यांच्याकडेच पालकमंत्री पद सोपविण्याची जोरदार मागणी होत असून त्यादृष्टीने लॉबिंग देखील सुरु झाले आहे.
महाजन यांनाच मागणी का?
भाजपच्या सत्ता काळात गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा मंत्रालयाबरोबरचं नाशिकचे पालकमंत्री पद होते. महाजन यांनी त्या काळात संघटना मजबूत करताना जिल्हा भाजपमय केला होता. महापालिका निवडणुकीत प्रथमच भाजपकडे एक हाती सत्ता दिली होती. जिल्हा परिषदे मध्ये भाजप सदस्य संख्या वाढविली.
कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकार सोसायट्या, नगरपालिका, परिषदा, ग्रामपंचायतींमध्ये भाजपची सत्ता आणली होती. येत्या काळात महापालिका निवडणुका आहे. महाजन यांना अनुभव असल्याने त्या आधारे त्यांच्याकडे जबाबदारी देण्यासाठी माजी नगरसेवकांचे लॉबिंग सुरु आहे.
पालकमंत्री पदाचे संकेत
गिरीश महाजन यांची अद्याप घोषणा झाली नसली तरी पालकमंत्री पद त्यांनाच मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरू आहे. त्यामुळे नद्या, नाले ओसंडून वाहतं असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
महाजन मुंबईतून पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून प्रशासनाकडून माहिती घेत आहे. मदत लागल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी अधिकार्यांना केले आहे. त्यामुळे महाजन यांच्याकडे पालकमंत्री पद येण्याचे संकेत मिळतं आहे.
नाशिकची जबाबदारी भाजपकडे
महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेली मंत्रिपदे तसेच मंत्री ज्या जिल्ह्यांचे पालक होते त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद भाजपकडे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नाशिकचे पालकत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ यांच्याकडे होते त्यामुळे शिंदे सरकारच्या काळातही नाशिकची जबाबदारी भाजपकडेच जाणार असल्याचे बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.