State Level Kho-Kho Tournament : नाशिकच्या मुलींनी घडविला इतिहास!

राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत नाशिक प्रथमच राहिला अजिंक्य
MLA Rahul Dhikle while felicitating the girls who won the school kho kho competition. Along with dignitaries from the field of sports.
MLA Rahul Dhikle while felicitating the girls who won the school kho kho competition. Along with dignitaries from the field of sports.esakal
Updated on

नाशिक : येथील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुलात सुरू असलेल्या १७ वर्षांआतील शालेय राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिकच्या मुलींनी बाजी मारत अजिंक्यपद पटकाविले आहे. खो- खोच्या इतिहासात प्रथमच मुली अजिंक्य ठरल्या आहेत. (girls of Nashik made history Nashik remained undefeated for first time in state level school khokho tournament nashik news)

मुलींचा अंतिम सामना नाशिक आणि कोल्हापूर विभागात झाला. नाणेफेक हरल्यामुळे नाशिक विभागाने पहिल्या आक्रमणात प्रतिस्पर्धी कोल्हापूर विभागाचे आठ गडी बाद केले. नाशिककडून कर्णधार सरिता दिवा हिने तीन गडी, ऋतुजा सहारे दोन गडी, तर सुषमा चौधरी व तेजल सहारे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

कोल्हापूर विभाग मात्र नाशिकच्या संरक्षणाची अभेद्य कडी भेदू शकले नाही. संरक्षण करताना सरिता दिवा तीन मिनीट ५० सेकंद, सुषमा चौधरी तन मिनीट आणि सोनाली पवार नाबाद दोन मिनीट दहा सेकंद यांच्या दमदार खेळीमुळे मध्यंतराला नाशिकच्या संघाकडे सहा गुणांची विजयी आघाडी होती.

दुसऱ्या डावात नाशिककडून ज्योती मेढे तीन मिनीट, ऋतुजा सहारे तीन मिनीट २० सेकंद, दीपिका बोरसे दोन मिनीट यांच्या सुंदर खेळीमुळे कोल्हापूर विभाग नाशिकचे केवळ तीन खेळाडू बाद करू शकला. अमृता पाटील आणि आरती पाटील यांची चांगली खेळी केली. मात्र, आपल्या संघाचा एकतर्फी पराभव टळू शकले नाही.

MLA Rahul Dhikle while felicitating the girls who won the school kho kho competition. Along with dignitaries from the field of sports.
India Cricket team : ‘फायनल फ्रंटियर’च्या आठवणींना उजाळा

यांचा झाला गौरव

नाशिक विभागाने हा सामना आठ विरुद्ध पाच, असा एक डाव तीन गुणाने जिंकून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. श्रीराम विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय पंचवटी यांनी नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व केले.

स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून नाशिकची ऋतुजा सहारे, सर्वोत्तम संरक्षक सुषमा चौधरी, तर कोल्हापूर विभागाची अमृता पाटील हिला सर्वोत्तम आक्रमक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

नाशिक विभागाच्या संघात सोनाली पवार, सरिता दिवा, सुषमा चौधरी, ताई पवार, या चार राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंबरोबरच दीक्षा सीतड, ऋतुजा सहारे, तेजल सहारे, ज्योती मेढे, दीपिका बोरसे, हितेशा जाधव यांचा समावेश आहे. आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.

निवृत्त सहाय्यक पोलिस निरीक्षक नवलनाथ तांबे, शिवछत्रपती पुरस्कारविजेते अविनाश खैरनार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, नाशिक जिल्हा खो-खो असोचे कार्याध्यक्ष आनंद गारंमपल्ली, खजिनदार सुनील गायकवाड, तालुका क्रीडा अधिकारी महेश पाटील, संदीप ढाकणे, भाऊसाहेब जाधव, छाया उदर, सहकार्यवाह कांतिलाल महाले, दत्ता गुंजाळ उपस्थित होते.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

MLA Rahul Dhikle while felicitating the girls who won the school kho kho competition. Along with dignitaries from the field of sports.
Impact of Budget 2023 : Sports Scienceसाठी अवघ्या 13 कोटी तरतुदीमुळे नाराजी

मुलांमध्ये लातूरचा विजय

मुलांचा अंतिम सामना लातूर आणि कोल्हापूर या दोन विभागात झाला. पूर्ण सामन्यात १३ विरुद्ध १३ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघांना एक जादा डाव देण्यात आला. पण त्यातही पाच विरुद्ध पाच अशी समान गुणसंख्या राहिल्याने लघुत्तम आक्रमणद्वारे म्हणजे जो संघ प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडूला बाद करेल, त्या संघाला विजयी संघ म्हणून जाहीर केले जाते.

काही सेकंदाच्या फरकाने लातूर विभागाने कोल्हापूर विभागाचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेतील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून लातूर विभागाचा शंभू पेठे, तर संरक्षक म्हणून रवि वसावे, तर आक्रमक म्हणून कोल्हापूर विभागाच्या विराज गळतगे याची निवड करण्यात आली. या स्पर्धेत मुलांमध्ये नाशिक विभागाने, तर मुलींच्या गटात मुंबई विभागाने तृतीय स्थान प्राप्त केले.

MLA Rahul Dhikle while felicitating the girls who won the school kho kho competition. Along with dignitaries from the field of sports.
Sports Shoes For Women : क्वालिटीच दिसणार राव! असे स्पोर्ट्स शूज घातले तर मैत्रिणी जळून खाक होणार; पहा लिस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.