Nashik News: शेतीमालाला भाव द्या, नाहीतर गोळ्या झाडा! मुंजवाड येथील तरुण शेतकऱ्यांचे पंतप्रधानांना पत्र

Unemployed youths of Munjwad Farmers Association showing letter and application form to the Prime Minister.
Unemployed youths of Munjwad Farmers Association showing letter and application form to the Prime Minister.esakal
Updated on

Nashik News : शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकरी द्यावी, नोकरी देणे शक्य नसल्यास तितके मानधन मिळावे आणि जर या चारही बाबी देणे शक्य नसेल तर बंदुकीच्या गोळ्या झाडून आमचे कष्टमय जीवन संपवून आम्हाला मुक्ती द्यावी.

अशी आर्त मागणी मुंजवाड (ता. बागलाण) येथील शेकडो शेतकरी संघटना, सुशिक्षित बेरोजगार युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शैक्षणिक पात्रतेच्या प्रती व अर्ज पाठवून केली आहे. ही मोहीम राज्यभर राबविणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष केशव सूर्यवंशी यांनी दिला. (Give price to agricultural products otherwise shoot letter from young farmers of Munjwad to PM modi Nashik News )

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Unemployed youths of Munjwad Farmers Association showing letter and application form to the Prime Minister.
Nashik: डॉ. मंगरूळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी; नाशिक विभागात उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बदल्या

मुंजवाड येथील महादेव मंदिराच्या सभागृहात सोमवारी (ता.१२) सकाळी गावातील तरुण शेतकरी युवकांचा मेळावा झाला. देशातील प्रत्येक सुशिक्षित शेतकऱ्याने पंतप्रधानांना वैयक्तिक पत्र पाठवून ही मोहीम राबवावी असा ठराव मुंजवाड शेतकरी संघटनेचे महेंद्र जाधव यांनी मांडला.

यावेळी गावातील सर्व तरुण शेतकरी बेरोजगार युवक, शेतकरी संघटनेचे माणिक निकम, मोरेनगरचे उपसरपंच व्यंगचित्रकार किरण मोरे, भास्कर बागूल, नयन सोनवणे व मुंजवाड परिसरातील शेकडो तरुण शेतकरी उपस्थित होते.

Unemployed youths of Munjwad Farmers Association showing letter and application form to the Prime Minister.
Nashik News: देवळा बाजार समितीचे शेतकरी निवास खुले! शेतकऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.