Nashik News: शिक्षकसह भरतीचे अधिकार शिक्षणसंस्था चालकांना द्या : मुंबईतील बैठकीत मागणी

Present in the meeting of the State Educational Institutions Corporation were the President of the Corporation and Member of Parliament Supriya Sule, former Minister Vijay Naval Patil,
Present in the meeting of the State Educational Institutions Corporation were the President of the Corporation and Member of Parliament Supriya Sule, former Minister Vijay Naval Patil,esakal
Updated on

Nashik News : राज्य शिक्षण संस्थाचालक महामंडळाची बैठक मुंबई येथे होऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी त्वरित उठवून ती सुरु करावी यासाठी संस्था महामंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत बैठक घेऊन भरतीचे सर्व अधिकार संस्थाचालकांना द्यावे असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. (Give recruitment powers to educational institutions including teachers Demand in meeting in Mumbai Nashik News)

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली व महामंडळाचे कार्याध्यक्ष माजी मंत्री विजय नवल पाटील याच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली.

यात शाळांना वेतनेत्तर अनुदान थकीत वेतनासह बारा ट्क्के व्याजाने देणे, न्यायालयीन प्रकरणाचा आढावा घेणे, चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती व त्यांच्या मानधनात वाढ करणे, राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांत रूप टाँप सोलर बसविणे, भरती बाबतचे सर्व अधिकार संस्थाचालकांना देणे,

शासनाच्या प्रत्येक शैक्षणिक निर्णयात संस्थाचालक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ३६ शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशीची मागणी केली आहे, ती योग्य आहे. नविन शैक्षणिक धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Present in the meeting of the State Educational Institutions Corporation were the President of the Corporation and Member of Parliament Supriya Sule, former Minister Vijay Naval Patil,
Nashik News: मनमाडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट

संस्थाचालक महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक थोरात, वसंतराव भुईखेडकर, विजय गव्हाणे, कार्यवाह रवींन्द्र फडणविस, मिलींद पाटील, गणपतराव बालवाडकर, विनय राऊत, शिवाजी माळकर, अनिल शिंदे, आमदार किरण सरनाईक,

देवजी घुईखेडकर, आमदार चिमणराव पाटील आणि माजी आमदार चंद्रकात रघुवंशी, वसंतराव जवळकर, मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, कोंडाजी आव्हाड नाशिक व नगरचे समन्वयक एस. बी. देशमुख, रामचंद्र जाधव, एन. डी. नांद्रे हे कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

"शिक्षकेतर कर्मचारी भरती त्वरित करण्यात येऊन. त्यांना सेवेत कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे . अनेक संस्थेत कर्मचारी अनेक वर्षांपासून काम करीत आहे त्यांची लवकरात लवकर भरती व्हावी . कर्मचाऱ्यांसाठी दहा, वीस ,तीसची आश्वाशीत प्रगत योजना लागू करावी. अशी मागणी महामंडळाने केली." - एस. बी. देशमुख, समन्वयक संस्था चालक महामंडळ.

Present in the meeting of the State Educational Institutions Corporation were the President of the Corporation and Member of Parliament Supriya Sule, former Minister Vijay Naval Patil,
Mahavikas Aghadi: निवडणुकांमध्ये आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : ॲड. रवींद्र पगार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()