Ram Lalla Pran Pratishtha : येवल्यात कारसेवकांचा गौरव; रामभजन संध्येत रामभक्त मंत्रमुग्ध

संस्कृतीच्या अस्मितेसाठी भगवान श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी होऊन या कार्यात दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा मिळाला अन्‌ मनोमन धर्मज्योत तेवली.
Officials honoring the Karsevaks who participated in the protest in Ayodhya. In the second photograph, a mesmerized Ram devotee during the evening of Ram Bhajan.
Officials honoring the Karsevaks who participated in the protest in Ayodhya. In the second photograph, a mesmerized Ram devotee during the evening of Ram Bhajan.esakal;
Updated on

Ram Lalla Pran Pratishtha : १९९२ मधील अयोध्या आणि परिसरात जाऊन कारसेवकांनी सनातन संस्कृतीच्या अस्मितेसाठी भगवान श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी होऊन या कार्यात दिलेल्या योगदानाच्या स्मृतींना उजाळा मिळाला अन्‌ मनोमन धर्मज्योत तेवली.

निमित्त ठरले ते कारसेवक गौरव, सत्कार सोहळ्यासह रामभजन संध्या कार्यक्रमाचे.(glory of Karsevaks in Yeola for ram puja nashik news)

अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ६० कारसेवकांसह सनातन धर्मप्रेमी १४० युवकांचा सत्कार करण्यात आला. रामोत्सव भजन संध्यामुळे भक्तिमय वातावरणात रामभक्त येवलेकर न्हाऊन निघाले. हा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री भारती प्रवीण पवार यांच्या प्रेरणेने डॉ. उमेश काळे व वीर सावरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे व कार्यकर्त्यांतर्फे हा कार्यक्रम झाला. रामभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला.

१९९२ मध्ये अयोध्येत झालेल्या जन्मभूमी मुक्ती आंदोलनात येथून शेकडो जण सहभागी झाले होते. रेल्वे, बस, गाड्या मिळेल, त्या वाहनाने कारसेवक राममंदिराच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पोलिस आणि सुरक्षा दलांनी उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे अडविल्या होत्या. त्यामुळे कारसेवक रेल्वेतून उतरून अयोध्येच्या दिशेने चालत गेले. त्यादिवशी लाखो कारसेवक अयोध्या आणि परिसरात असल्याच्या आठवणी यानिमित्त ताज्या झाल्या.

प्रारंभी भाजप जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ, कारसेवकांचे प्रतिनिधी सुनील सस्कर, गजानन जटे, ज्ञानेश्वर लुटे, आशिष भोजने, ज्ञानेश्वर सांबर, प्रशांत क्षीरसागर यांच्यासह मान्यवरांनी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.

Officials honoring the Karsevaks who participated in the protest in Ayodhya. In the second photograph, a mesmerized Ram devotee during the evening of Ram Bhajan.
Ram Lalla Pran Pratishtha : पंचवटी रामायणाची मूळ धरोहर व्हावी

भाजप जिल्हा महामंत्री आनंद शिंदे यांनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आपल्या सर्वांसाठी धैर्य, संयम, शौर्य आणि मर्यादेचे पालन करण्याचे प्रतीक आहेत. अयोध्या येथील पवित्र श्रीराम जन्मभूमी ४९६ वर्षांनंतर मुक्त झाली आहे. ४५०० ओव्यांचे स्वलिखित रामायणकार निंबा शिनकर यांचा गौरव झाला. अमित हरिनामे यांच्यासह सहकाऱ्यांच्या सुमधुर आवाजात राम भजन संध्याचा कार्यक्रम झाला. पैठणी उद्योजक श्रीनिवास सोनी यांनी बासरी वादन केले.

राम आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. लासलगाव मंडलाध्यक्ष नीलेश सालकडे, विधानसभा विस्तारक गोविंद कुशारे उपस्थित होते. दत्ता महाले यांनी सूत्रसंचालन केले. भाजप शहराध्यक्ष मीननाथ पवार यांनी आभार मानले. युवराज पाटोळे, संतोष काटे, बंटी धसे, गणेश खळेकर, बडाअण्णा शिंदे, मच्छिंद्र पवार, दिनेश परदेशी, राहुल लोणारी, अतुल काथवटे, गणेश ठाकूर, सौरभ गडकर, दर्शन भिंगरकर, शुभम पवार, बाळासाहेब शिंदे, ज्ञानेश्वर महाले, धनंजय नागपुरे, मयूर लकारे, श्रीकांत खंदारे, नीलेश परदेशी, संतोष नागपुरे, धनराज पोकळे व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

भक्तांनी धरला ठेका!

‘मेरी झोपडी के भाग, आज खुल जाएंगे, राम आएँगे,राम आएँगे आएँगे’ यासह अनेक राम भजने भजन संध्या कार्यक्रमात सादर करण्यात आली. या भजनांवर रामभक्तांसह महिलांनी ठेका धरत रामनामाचा जयघोष केला. शेवटी प्रभू रामचंद्राची आरती करण्यात आली.

Officials honoring the Karsevaks who participated in the protest in Ayodhya. In the second photograph, a mesmerized Ram devotee during the evening of Ram Bhajan.
Ram Mandir Pran Pratishtha : रामचरणलाही मिळालं राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.