पिंपळगाव बसवंत : तीन हजार रुपये प्रतिक्रेट्स, असा सोन्यासारखा भाव मिळत असताना, केंद्र शासनाच्या डोळ्यात खुपले अन् थेट नेपाळहून टोमॅटो आयातीचा घाट त्यांनी घातला. तेथून टोमॅटोच्या भावाला दृष्टच लागली.
भाव पत्त्यासारखे कोसळत सरासरी शंभर रुपये प्रतिक्रेट्सपर्यंत गडगडले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. दरवाढ होईल, याच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी हतबल झाले.
वाहतूक खर्चही निघत नसल्याने पाचोरे वणी (ता. निफाड) येथील शेतकरी गौतम वाटपाडे यांनी टोमॅटोच्या शेतात थेट शेळ्या-मेंढ्या चरायला सोडल्या. (Goats and sheep left in tomato fields Transport costs do not go with production Crush dream of farmers Nashik)
टोमॅटोचे पीक हे जुगारी पीक म्हणून ओळखले जाते. ही जुगारी ओळख यंदा अधिकच गडद झाली. तीन हजार रुपये प्रतिक्रेट्स, असा भाव मिळत असल्याने मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली.
मात्र, वाढलेल्या दराचा मोठा गजब झाला अन् नेहमीप्रमाणे केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे धोरण राबविले. नेपाळमधून आयातीची घोषणा होताच टोमॅटोच्या दराची घसरगुंडी झाली आणि टोमॅटो उत्पादकांच्या स्वप्नांचा अक्षरश: लाल चिखल झाला.
बियाणे, खते, औषधे, असा सुमारे एक लाख रुपये टोमॅटोच्या उत्पादनासाठी खर्च येतो, पण सध्या ८० रुपये प्रतिक्रेट्सला भाव मिळत असल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे.
शिवाय काढणी व वाहतुकीचा सुमारे ६० रुपये प्रतिक्रेट खर्च येत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघेना, काढणी व वाहतूक खर्च परवडत नसल्याने टोमॅटोचा जुगार शेतकऱ्यांना कंगाल करणारा ठरत आहे.
शेतकरी संकटात
अगोदर कुठल्याच शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. टोमॅटोच्या दराची लाली ओसरल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ अशी स्थिती आहे.
रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकल्याचे चित्र आजपर्यंत दिसत होते, पण हतबल झालेले शेतकरी आता काढणी करण्याऐवजी टोमॅटोचे पीक जनावरांना खाद्य म्हणून देत आहेत.
पाचोरे वणी (ता. निफाड) येथील शेतकरी गौतम वाटपाडे यांनी दोन एकर टोमॅटोच्या पिकात थेट शेळ्या-मेंढ्या चरायला सोडल्या आहेत.
उत्पन्न मिळण्याऐवजी त्यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली. बाजारभावाअभावी जनावरांचे खाद्य ठरलेले टोमॅटोचे पीक हे चित्र शेतकऱ्यांची दुर्दशा दाखविण्यासाठी बोलके आहे.
"आकर्षक बाजारभाव मिळत असल्याने दोन एकरांत टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी सुमारे सव्वादोन लाख रुपये खर्च केला. मात्र, बाजारभाव शंभर रुपये प्रतिक्रेट्सच्या आत आल्याने उत्पादन खर्चही मिळेना व वाहतूक खर्चही परवडत नव्हता. अखेर टोमॅटोच्या शेतात शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी सोडून दिले."- गौतम वाटपाडे, शेतकरी, पाचोरे वणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.