नाशिक : महापालिकेकडून गोदावरी नदी पात्राची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. ट्रॅश स्किमर मशिनद्वारे गोदावरी पात्रातील पानवेली हटविली जात असून दररोज सुमारे आठ ते दहा टन पानवेली हटविली जात आहे. (Godavari Conservation chamber 10 tonnes of panveli removal work per day nashik news)
हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार
चांदशी शिवारात आनंदवलीपर्यंत नदी पात्रातील संपूर्ण पानवेली काढली जात आहे. सुरवातीला शहरातील होळकर पूल, घारपुरे घाट तसेच चोपडा लॉन्स परिसरात क्रॅश स्कीमर मशिनद्वारे पानवेली काढण्यात आली. स्मार्टसिटीकडून होत असलेल्या या कामावर आता महापालिकेच्या गोदावरी संवर्धन कक्षाचे नियंत्रण राहणार आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांसह सामाजिक संस्था, एनसीसी कॅडेट्स यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम सुरू आहे. यापुढेही गोदापात्र स्वच्छतेसाठी दक्षता घेतली जाणार असल्याचे गोदावरी संवर्धन कक्षप्रमुख डॉ. विजयकुमार मुंढे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.