Nashik Godavari Aarti : नाशिककरांना वेध गोदा महाआरतीचे

चौदा वर्षाच्या वनवास दरम्यान प्रभू श्रीराम यांचे नाशिकला असलेले वास्तव्य आणि सीतेच्या अपहरणासह शूर्पनखेचे नाक कापणे, यासारखे रामायणातील काही प्रसंगामुळे नाशिकला ‘रामभूमी’ पण म्हटले जाते.
Godaghat
Godaghatesakal
Updated on

Nashik Godavari Aarti : प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्यानगरी सज्ज होत असतानाच नाशिककरांना २२ जानेवारीकडे लक्ष लागले आहे.

प्रभू श्रीरामाचे वास्तव्य राहिलेल्या नाशिकला याच मुहूर्तावर गोदावरी महाआरतीचे नियोजन केले जात आहे.(Godavari Maha Aarti is being planned for pm narendra modi nashik news)

चौदा वर्षाच्या वनवास दरम्यान प्रभू श्रीराम यांचे नाशिकला असलेले वास्तव्य आणि सीतेच्या अपहरणासह शूर्पनखेचे नाक कापणे, यासारखे रामायणातील काही प्रसंगामुळे नाशिकला ‘रामभूमी’ पण म्हटले जाते.

येथील तपोवनात आजही रामायणातील अनेक स्मृतींचे जतन केले जाते. त्यामुळे अनेक पौराणिक संदर्भ या शहराशी जोडले गेले आहेत. ()

रामायणातील या पार्श्वभूमीने नाशिकचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. दक्षिणवाहिनी गंगा गोदावरी नाशिकमधूनच वाहते. रामतीर्थ परिसरात वाराणसी, हरिद्वारच्या धरतीवर गोदा महाआरती व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.

शहरातील आमदारांनी त्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला. या विषयाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली. परंतु, महाआरती प्रत्यक्षात सुरू होऊ शकली नाही.

२२ जानेवारीच्या अयोध्येतील सोहळ्याच्या मुहूर्तावरच नाशिकला गोदा महाआरती होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यानिमित्ताने गोदा महाआरतीच्या शुभारंभाची नागरिकांना आस लागली आहे. सध्या दररोज सायंकाळी सातला छोट्या स्वरूपात आरतीला भव्य दिव्य स्वरूप देण्याचे प्रयत्न सध्या गतिमान झाले आहेत.

Godaghat
Godavari Maha Aarti : गोदावरी आरतीसाठी दोन टप्प्यात 42 कोटीचा आराखडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.