Godavari River Crisis: ऐन पावसाळ्यात गोदावरी तहानलेलीच!

Godavari river nashik
Godavari river nashiksakal
Updated on

Godavari River Crisis : गंगापूर धरणात अवघा ३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे गतवर्षी या काळात दुथडी वाहणारी गोदामाईचे पात्र भरपावसाळ्यात काळवंडले आहे.

नदी प्रवाहित नसल्याने कुंडांना गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यंदा पावसाने जिल्ह्यात चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे या काळात खळाळून वाहणाऱ्या गोदावरीलाही आता दमदार पावसाची अपेक्षा आहे. (Godavari River Crisis Godavari thirsty in rainy season)

मागील वर्षी याच काळात १० हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला होता. संपूर्ण जून कोरडाठाक गेल्यावर जुलैमध्येही समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाचे दोन महिने संपत आले तरी सर्वच धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांच्या पुढे जायला तयार नाही, त्यामुळे प्रशासनापुढील चिंताही वाढली आहे.

सोमवारी (ता. १७) दीप अमावस्या असून या दिवशी अनेक महिला सायंकाळी रामतीर्थावर पाण्यात दिवे सोडण्यासाठी येतात, परंतु नदीच प्रवाही नसल्याने अनेक महिलांचा हिरमोड झाला. मागील वर्षी याच काळात गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता.

त्यामुळे गंगापूर धरणातून गोदापात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे या काळात गोदावरीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. परंतु यंदा काळवंडलेले पात्र, नदीच्या तपोवन भागात मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या पानवेली, पात्रातील कचरा याचेच दर्शन होत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Godavari river nashik
Water Crisis: चणकापूर, हरणबारीच्या जलसाठ्यात वाढ! गिरणातील जलसाठ्यात मात्र घट

वरुणेची तीच अवस्था

म्हसरूळ परिसरात उगम पावणाऱ्या वरुणेला (वाघाडी) गतवर्षी याच काळात मोठा पूर आला होता. वाघाडीचे पाणी संपूर्ण म्हसोबा पटांगणावर पसरले होते.

यंदा सगळीकडेच पावसाने दडी मारल्याने वरुणेतूनही पावसाच्या पाण्याऐवजी गटारींचेच पाणी वाहत आहे. वाघाडी प्रवाहित नसल्याने या भागात डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

Godavari river nashik
Nashik Water Crisis: जुलैच्या मध्याला 15 जिल्ह्यातील 1300 गावे अन वाड्या तहानलेल्या!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.