गोदावरी, उपनद्यांचे होणार GIS Mapping! ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी सल्लागाराला NMCच्या सूचना

Namami Goda Project news
Namami Goda Project newsesakal
Updated on

नाशिक : नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच सौंदर्यीकरण करण्यासाठी ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी गोदावरीसह उपनद्यांचे जीआयएस मॅपिंग केले जाणार आहे.

जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून नमामि गोदा प्रकल्पाचा बेस मॅप तयार केला जाणार आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने महापालिकेकडूनदेखील गोदाघाट परिसरात कामे होणार आहे. स्मार्टसिटी कंपनीकडून सध्या प्रोजेक्ट गोदा हाती घेण्यात आला आहे.

सदर कामे दुबार होऊ नये म्हणून जीआयएस मॅपिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Godavari tributaries will GIS Mapping NMC instructions to consultant for Namami Goda project nashik news)

महापालिकेच्या नगर नियोजन विभागामार्फत शहरातील मालमत्ता, सार्वजनिक रस्ते, मिळकती, नैसर्गिक नाले आदींचे ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम (जीआयएस) मॅपिंग करण्याचे काम सुरू आहे. मॅपिंग काम सुरू असताना नमामि गोदा प्रकल्पासाठीदेखील बेस मॅप तयार करणे आवश्यक असल्याने त्यासाठीदेखील जीआयएस मॅपिंग करावी लागणार आहे.

त्याअनुषंगाने मिळकत विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत. नाशिकचे जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीसह पाच उपनद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सिंहस्थाच्या निमित्ताने महापालिकेकडून गोदावरी या विषयावर करोडो रुपये खर्च केले जातील.

स्मार्टसिटी कंपनीकडून प्रोजेक्ट गोदा हाती घेण्यात आला आहे. यात गोदावरीचे सुशोभीकरण केले जात आहे. नमामि गोदा प्रकल्पातदेखील गोदावरी सौंदर्यीकरण व प्रदूषणमुक्तीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

कामांचे प्रस्ताव तयार करताना दुबार कामे होऊ नये, यासाठीदेखील जीआयएस मॅपिंग करणे आवश्यक असल्याचे सूचनेत नमूद केले आहे. सध्या जीआयएस मॅपिंग काम अक्षय इंजिनिअरच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्याच माध्यमातून सध्या सुरू असलेल्या कामाच्या अनुषंगाने मॅपिंग केले जाणार आहे.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

Namami Goda Project news
Nashik News: यंदा व्‍यावसायिक अभ्यासक्रमांचे वेळेतच प्रवेश; CET परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर

प्रकल्पात महत्त्वाचे

महापालिकेच्या माध्यमातून गोदावरी नदी व उपनद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पुढील वीस वर्षांचा विचार करून मलनिस्सारण योजनेचा सर्वंकष अभ्यास करून प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविणे,

त्यासाठी संपूर्ण योजनेचा बेस तयार करणे, अस्तित्वातील मलवाहिका नव्याने टाकणे, अस्तित्वातील पंपिंग स्टेशन व मलनिस्सारण केंद्राची क्षमता वाढविणे किंवा नवीन मलनिस्सारण केंद्राची उभारणी करणे, नद्यांच्या तीरावर घाट बांधणे, सुशोभीकरण करणे, सांडपाण्याचा पुनर्वापर करणे आदी कामे केली जाणार आहेत.

Namami Goda Project news
Makar Sankranti 2023 : शहरात पतंगप्रेमींचा उत्साह शिगेला; सलग सुटी आल्याने आनंद द्विगुणित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.