Nashik : रामकुंड नव्हे...रामतीर्थ!; तीर्थांच्या स्‍थान निश्‍चितीतून गोदावरी होणार प्रवाहित!

Godaghat
Godaghatesakal
Updated on

नाशिक : गोदावरीचे स्रोत असलेले विविध तीर्थ प्रभावित झाले आहेत. नदी बारमाही प्रवाहित करायची झाल्यास पहिल्यांदा या तीर्थांची स्‍थान निश्‍चिती करणे गरजेचे आहे. त्यामाध्यमातून नैसर्गिक स्रोत पुन्‍हा जागृत करता येऊ शकतील, असे जाणकारांचे म्‍हणणे आहे. दरम्‍यान, काँक्रीटीकरण काढल्‍याने पुराची पातळी साडेतीन मीटरपर्यंत घटल्‍याचा दावा करण्यात येत आहे. (Godavari will flow from places of pilgrimage Nashik Latest Marathi News)

दक्षिण गंगा म्‍हणून ओळखली जाणारी गोदावरी रामतीर्थावरुन दक्षिणवाहिनी होत असल्‍याने या परिसराला मोठे धार्मिक महत्त्‍व आहे. परिसरातील विविध तीर्थ नदीला कायम प्रवाहित ठेवत असतात. परंतु, गेल्‍या काही वर्षांमध्ये नैसर्गिक स्रोत प्रभावित झाले असल्‍याने नदीत पाणी साठून राहते. त्यामुळे पाण्यातून दुर्गंधी येत असून परिसरात आरोग्‍याचा प्रश्‍न गंभीर उद्भवतो. त्यावर उपाय म्हणून सर्व तीर्थांची स्‍थान निश्‍चिती करून नैसर्गिक स्रोत पुनर्जीवित करण्याचा आग्रह धरला जात आहे. अर्थात, त्यासाठी सरकार, राजकीय पक्षांचे नेते आणि सर्वांत महत्त्‍वाचे म्‍हणजे नाशिककरांची इच्‍छाशक्‍ती असणे महत्त्‍वाचे आहे.

कागदपत्रांचा अभाव

कुंड अथवा तत्सम बांधकामाचे नकाशे असतात. गॅझेटमध्ये बांधकाम विषयी नोंदी आढळून येतात. मात्र तीर्थ हा निसर्गाचा प्रवाह असून त्याचा उल्‍लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आहे. तीर्थाच्‍या स्‍थान निश्‍चितीसंबंधी कागदपत्रांचा अभाव दिसतो. त्यामुळे नैसर्गिक स्रोत जागृत करण्यात अडचणी उद्भवत आहेत. दीर्घ न्‍यायालयीन लढ्यानंतर रामतीर्थ परिसरातील गोदावरी पात्रातील काँक्रीटीकरण काढण्यात आले. सुमारे साडेतीन लाख किलो मलबा या ठिकाणाहून काढण्यात आला. गेल्‍या दोन वर्षांमध्ये त्याचे सकारात्‍मक परिणाम झाले असून पूर पातळी घटल्याचा दावा करण्यात येत आहे.

Godaghat
Bajar Samiti Election : शेतकऱ्यांच्या उमेदवारीने नेतृत्वाची वाढणार डोकेदुखी!

गोमुखातील पाणी झाले बंद

नैसर्गिक स्रोत प्रभावित झालेले असल्‍याने पाण्याचे काही जिवंत झरे अद्याप कायम आहेत. पाण्याचे काही स्रोत आटले आहेत. अरुणा संगम तीर्थ असलेल्‍या रामतीर्थावरील गोमुखातून काही कालावधीपूर्वीपर्यंत पाणी येत होते. परंतु, सद्यःस्‍थितीत हे पाणी आटले असून त्याबाबत सखोल संशोधन होण्याची आवश्‍यकता आहे.

गोदावरीला प्रवाहित करणारे प्रमुख तीर्थ

- ब्रह्म

- बद्रिकाश्रम

-दत्त

- बाण

- लक्ष्मण

-धनुष्य

- राम

- अस्‍थिविलय

- अरुणा संगम

- अहिल्‍या

- हनुमान

- सूर्य

- रामगया

- महादेव

- खंडोबा

- ओमकारचे कुंड

- मुक्‍तेश्‍वर

- इंद्र (या तीर्थातंर्गत अस्‍थिविलय, अश्‍व, अरुणा संगम तीर्थ येतात).

"तीर्थांचे स्‍थान निश्‍चिती करून गोदावरी प्रवाहित करण्यासाठी प्रयत्‍न झाले पाहिजेत. काँक्रीटीकरण काढल्‍याचे सकारात्‍मक परिणाम दिसत असून पूर पातळीत साडेतीन मीटरपर्यंत घट झाली आहे. नैसर्गिक स्रोत पुन्‍हा जागृत करण्यासाठी प्रयत्‍न झाले पाहिजेत."

- देवांग जानी, गोदाप्रेमी.

Godaghat
Nashik : ZP निधी नियोजनावर पालकमंत्र्यांचा वरचष्मा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.