Crime Update : सोनसाखळी चोरताना ‘तो’ दुचाकीची नंबर प्लेट झाकत

arrest
arrestesakal
Updated on

नाशिक : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचणाऱ्या संशयित चोरट्याला सातपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. चंद्रकांत कौतिक केदारे (२८, रा. श्रमिकनगर, सातपूर), असे चोरट्याचे नाव आहे. संशयित गुन्ह्यातील दुचाकीची पुढची नंबर प्लेट रुमालाने, तर मागची नंबर प्लेट प्लॅस्टिकच्या पिशवीने झाकायचा.

जेणेकरून कोणाला दुचाकीचा क्रमांक दिसू नये, अशी शक्कल वापरायचा. नेमकी त्याने वापरलेली हीच अजब शक्कल त्याला जेरबंद करण्यास कारणीभूत ठरली. (Gold Chain snatcher arrested by satpur police nashik Latest Marathi News)

arrest
Nashik : 5 दिवसात 299 गणेशमूर्तींचे संकलन

संशयित चंद्रकांत हा एकटाच दुचाकीवरून (एमएच- १५- एचई- ७६९१) चोरी करायचा. सोनसाखळी खेचण्यापूर्वी तो रेकी करायचा. दुचाकीच्या पुढच्या नंबर प्लेटला तो रुमालाने बांधून झाकायचा तर, पाठीमागील नंबर प्लेटवर प्लॅस्टिकची पिशवी बांधून झाकायचा. त्यानंतर पादचारी वा मुलांना शाळेत सोडविण्यासाठी निघालेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या सोनसाखळ्या खेचून पोबारा करायचा.

यातून एका तक्रारदाराने मात्र सदरची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणली. चोरलेले सोने संशयित केदारे कृष्णा दिलीप टाक (३७, रा. श्रमिकनगर, सातपूर) या सोनारास विकत होता. चौकशीतून ही बाब उघडकीस येताच पोलिसांनी टाक यासही अटक केली आहे.

सातपूर परिसरातून केदारे याने केल्याच्या तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर याशिवाय त्यांच्याविरुद्ध मालेगावात चोरीचे दोन, तर जायखेडा पोलिसात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याची उकल उपनिरीक्षक हेमंत नागरे यांनी शिताफीने केली.

arrest
Nashik : सिडकोत देखावे बघण्यासाठी तुडुंब गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.