Nashik Crime News : मृतदेहाच्या अंगावरील सोने चोरले; सिव्हिलमधील प्रकार

जिल्हा रुग्णालयात नोकरीला असल्याचे भासवून संशयिताने मयत महिलेच्या अंगावरील १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र व अन्य दागिने परस्पर काढून घेतले.
crime
crime esakal
Updated on

Nashik Crime News : जिल्हा रुग्णालयात नोकरीला असल्याचे भासवून संशयिताने मयत महिलेच्या अंगावरील १५ हजार रुपयांचे मंगळसूत्र व अन्य दागिने परस्पर काढून घेतले. सदरची बाब नातलगांच्या लक्षात आल्यानंतर चौकीतील पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी तात्काल सीसीटीव्ही फुटेज तपासून परिसरात असलेल्या संशयितांच्या मुसक्या आवळल्यात आणि त्यास सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले. (gold from the dead body was stolen at civil hospital nashik crime news)

सुरज सुनील भवर (२६, रा. विजय नगर, हिरावाडी रोड, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. गणेश दिलीप माने (रा. दत्तनगर, पेठरोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या आत्या मंगल दत्तात्रय कदम (रा. शिवाजीनगर, सातपूर) यांचे शनिवारी (ता. २०) सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

त्यावेळी वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले. त्यामुळे मयत कदम यांच्या नातलगांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाच्या पोर्चमध्येच स्ट्रेचरवर त्यांचा मृतदेह होता. पोलीस पंचनामा झाल्यानंतर मयत कदम यांचे शवविच्छेदन केले जाणार होते. त्यामुळे सिव्हिल पोलीस चौकीतील पोलिसांनी नातलगांना मयत कदम यांच्या अंगावरील दागदागिने काढून घेण्यास सांगितले.

crime
Nashik Crime News : कारमधून साडेतीन कोटींचे दागिने लंपास; पोलिसांपुढे चोरट्यांचे आव्हान

त्यावेळी काही नातलग महिला या मयत कदम यांच्याजवळ गेल्या असता, त्याचवेळी संशयित सुरज भवर त्याठिकाणी आला आणि आपण शवविच्छेदन कक्षातील कर्मचारी असून, शवविच्छेदन कक्षामध्येच त्यांच्या अंगावर दागिने काढण्यात येतील असे सांगत सर्व नातलगांना बाजुला केले. त्यावेळी त्याने नातलगांची नजर चुकवून मयत कदम यांच्या अंगावरील मंगळसूत्र व अन्य दागिने असे १५ हजारांचे दागिने परस्पर काढून घेतले.

मयत कदम यांना शवविच्छेदनासाठी नेण्यापूर्वी बिल्ला बनविण्यासाठी नातलग रुग्णालयाच्या नोंदीकडे गेले असता, त्यावेळी त्याठिकाणी पुन्हा त्यांना, दागिने काढले का? असे विचारले. नातलग पुन्हा मयत कदम यांच्या अंगावरील दागिने काढण्यासाठी गेले असता, त्यांच्या अंगावर दागिने नव्हते. सदरची बाब त्यांनी तत्काळ सिव्हिल पोलीस चौकीतील पोलीस हवालदार पी.एस. जगताप, शरद पवार यांना दिली.

त्यांनी तत्काळ पोर्चमधील सीसीटीव्ही तपासले असता, त्यामध्ये निदर्शनास आलेल्या संशयिताचा पोलिसांनी रुग्णालयाच्या आवारात शोध सुरू केला. त्यावेळी तो रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच होता. त्यास पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
Nashik Crime News : घोटी येथील ड्रिंकिंग वॉटर निर्मिती कंपनीवर छापा; साडेचार लाखाचा माल जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.