Nashik News: भारत्तोलन स्पर्धेत मुकुंद आहेरला सुवर्णपदक; 4 राष्ट्रीय विक्रम करणारा राज्यातील पहिलाच खेळाडू!

Akanksha Vyavayahare, Mukund Aher & Veena Aher
Akanksha Vyavayahare, Mukund Aher & Veena Aheresakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : तमिळनाडू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ, वरिष्ठ व कनिष्ठ भारत्तोलन (वेटलिफ्टिंग) स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या मुकुंद आहेर याने ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रीय वरिष्ठ व कनिष्ठ गटाच्या वेटलिफ्टिंग प्रकारात कनिष्ठ गटात तीन तर वरिष्ठ गटात एक असे चार राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करत तीन सुवर्णपदके पटकावली. चार राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर करणारा मुकुंद महाराष्ट्रातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. (Gold Medal for Mukund Aher in India Weightlifting Competition first player from state to hold 4 national records Nashik News)

राष्ट्रीय स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात सहभागी होत मुकुंदने मध्ये स्नॅचमध्ये ११४ किलो वजन उचलून वरिष्ठ व कनिष्ठ या दोन्ही वयोगटात दोन नवीन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केले. स्नॅचमध्ये नवीन राष्ट्रीय विक्रमी कामगिरी करताना ज्युनियर मध्ये १०८ किलोचा व सिनियर मध्ये ११४ किलोचे वजन उचलत विक्रमी कामगिरी बजावली.

क्लिन जर्कमध्ये सुद्धा ज्युनिअरचा १३९ किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढीत १४० किलो वजन उचलून ज्युनिअर मध्ये नवीन राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केला. २४४ किलोचा एकूण वजन उचलण्याचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत २५४ किलो वजन उचलत ज्युनिअर गटामध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला. चार नवीन राष्ट्रीय विक्रमासह ज्युनिअर सीनियर व आंतरराज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदके पटकावली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Akanksha Vyavayahare, Mukund Aher & Veena Aher
Nashik News: दिव्यांग निंबा सावंत यांची खडतर प्रवासातून भरारी! थेट मलेशियात अभ्यास दौऱ्यावर नियुक्ती

वीणा, आकांक्षा, मेघाची चकमदार कामगिरी

४० किलो मुलींच्या युथ वजनी गटात वीणा आहेर हिने चुरशीच्या लढतीत आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत स्नॅचमध्ये ५७ किलो व क्लिनजर्क मध्ये ६६ किलो असे एकूण १२३ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. आकांक्षा व्यवहारे हिने राष्ट्रीय स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात पहिल्यांदा सहभाग घेत ६५ किलो स्नॅच व ७९ किलो क्लिनजर्क असे १४४ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले.

४५ किलो ज्युनिअर गटामध्ये मेघा आहेर हिने ५६ किलो स्नॅच व ७९ किलो क्लिनजर्क असे एकूण १३५ किलो वजन उचलून पाचवा क्रमांक मिळविला. लागोपाठ दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Akanksha Vyavayahare, Mukund Aher & Veena Aher
Nashik News | रासाका ऊस उत्पादकांना देणार एकरक्कमी रक्कम : रामभाऊ माळोदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()