Nashik News : सोयगावातील जमिनींना सोन्याचा भाव; हद्दवाढीमुळे विकासाला नवे पंख

शहराजवळील सोयगाव, महानगरपालिका हद्दवाढीनंतर शहरात समाविष्ट झाल्याने या विभागाच्या विकासाचा परिघ वाढला आहे.
The attractive arch of the village
The attractive arch of the villageesakal
Updated on

Nashik News : शहराजवळील सोयगाव, महानगरपालिका हद्दवाढीनंतर शहरात समाविष्ट झाल्याने या विभागाच्या विकासाचा परिघ वाढला आहे. गाव विकासाला चालना मिळतानाच विविध सोयी, सुविधा उपलब्ध झाल्याने येथील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे.

सोयगाव नववसाहतीसह कॅम्प भागात हद्दवाढीपूर्वीच प्रगती झाली होती. या प्रगतीला यामुळे नवे पंख मिळाले आहेत. मोठ्या विकास कामांमुळे सोयगाव अपग्रेड होत आहे.(Gold price of lands in Soygaon nashik news)

सोयगावसह हद्दवाढीतील गावे काही वर्षांपासून झपाट्याने प्रगती करीत आहेत. सोयगावची बाजारपेठ हा येथील ब्रँड झाला आहे. सोयगावसह नववसाहत, कॅम्प भागाला माळमाथा परिसर वगळता कळवण, सटाणा, देवळा या तालुक्याच्या सीमाजवळ असल्याने तालुक्यासह कसमादेतील शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार व इतर घटक येथे स्थायिक झाल्याने येथील जागांचे भाव वधारले.

विकासाचा परिघ दिवसेदिवस वाढतोय. पूर्वी सोयगाव हे बच्छाव आडनावाचे एक कुळी गाव होते. विस्तारामुळे ही ओळख हरवून कसमादेतील रहिवाशांच्या वास्तव्याने अनेक कुळी गाव बनले. येथील लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास असून एका प्रभागात येथील चार नगरसेवक आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांची ही सासुरवाडी. मंत्र्यांच्या सासरवाडीचे गाव म्हणून नवी ओळख मिळाली.

लोकांच्या गरजा ओळखून येथे फ्लॅट व नवनवीन इमारती आकाराला येत आहेत. अलिकडच्या काळात सोयगावसह भायगाव, द्याने परिसरात फ्लॅटची संख्या वाढत चालली आहे. या गावामध्ये 'केजी टू पीजी' शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रस्ते, पाणी, लाइट, आरोग्य याबाबत सुधारणा झाली आहे.

मुख्य रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पिण्यासाठी महानगरपालिकेचे शुद्ध पाणी दोन दिवसाआड मिळते. आरोग्य केंद्र व अग्निशमन केंद्रही स्थापन झाले. भूमिगत गटारांची कामे पूर्ण झाली. जिजामाता उद्यान व उद्यानांची कामे झाली. शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालय हाकेच्या अंतरावर आले.

The attractive arch of the village
Nashik News: राज्यपाल रमेश बैस यांनी केली श्री काळाराम देवस्थानात महापूजा; विविध संकल्प करत केले श्रीरामाचे पूजन

सोयगावातील तरुणांनी गावचे नाव सातासमुद्रापार नेले. स्पर्धा परीक्षांच्या यशातून काहीजण अधिकारी झाले. दिवंगत हंसराज पाटील अप्पर जिल्हाधिकारी होते. डॉ. रवी वसंतराव पाटील हे शास्त्रज्ञ असून त्यांना तीन वेळा भारत सरकारचा ‘यंग सायंटिस्ट’ पुरस्कार मिळाला आहे. डॉ. नितीन बच्छाव यांनी शिक्षण उपसंचालक पद भूषविले. ते नाशिक प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत.

राजकीय पार्श्वभूमी अशी

यादवराव बच्छाव हे येथील पहिले तर शरद बच्छाव शेवटचे सरपंच होते. दरम्यानच्या काळात सुपडू बच्छाव, सुखदेव बच्छाव, दामोदर बच्छाव, हिरामण बच्छाव, बाबा बच्छाव, तात्यासाहेब बच्छाव, धनंजय बच्छाव, अल्काबाई बच्छाव यांनी गावाची धुरा सांभाळली.

पुढील पिढीत दिलीप बच्छाव, जयराज बच्छाव, ताराचंद बच्छाव, जे. पी. बच्छाव, देविदास अहिरे, नीलेश आहेर, विजय पोफळे यांनी कारभार पहिला. गावातील पहिला नगरसेवक होण्याचा मान शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर बच्छाव यांनी मिळविला. ॲड आर. के. बच्छाव दुसऱ्यांदा मविप्रचे संचालक झाले आहेत.

The attractive arch of the village
Nashik News: हे काम आमचे नव्हेच...! राज्यपालांच्या दौऱ्यात शासकीय यंत्रणेत असमन्वय

असे आहेत प्लॉटचे भाव (स्वेअर फूटमध्ये)

सोयगाव नववसाहत - १५०० ते २०००

बरंठ मळा - २००० ते २२००

डी. के. चौक परिसर - ३०००

कृषी नगर - १२०० ते १७००

कलेक्टर पट्टा परिसर - १२०० ते १५००

सटाना नाका परिसर - २५०० ते ३०००

The attractive arch of the village
Nashik News: हे काम आमचे नव्हेच...! राज्यपालांच्या दौऱ्यात शासकीय यंत्रणेत असमन्वय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.