Nashik Fraud Crime: स्वस्त सोन्याच्या आमिषाला सराफ व्यावसायिक भुलले! बनावट सोने देत घातला 20 लाखांचा गंडा

Money fraud
Money fraudesakal
Updated on

Nashik Fraud Crime : स्वस्तात सोने मिळत असल्याच्या आमिषाला भुलल्याने गंगापूर गावातील सराफ व्यावसायिकाला दोघा संशयितांनी २० लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक तालुका पोलिसांत दोघा संशयिताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. (Goldsmiths fooled by lure of cheap gold 20 lakhs of fake gold Nashik Fraud Crime)

विक्रम आहिरे यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर गावात किराण आढाव यांचे सराफाचे दुकान आहे. गेल्या आठवड्यात दुकानात एक अज्ञात युवक आला. त्याने वडिलोपार्जित सोने विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगत स्वस्तात अर्धा किलो सोने विकायचे असल्याचे सांगितले. त्याने सीमकार्ड आकाराच्या दोन सोन्याच्या चीफ आढावांना दिल्या.

त्या चीफची तपासणी केल्यानंतर त्या शुद्ध सोन्याच्या होत्या. त्यामुळे स्वस्तात सोने मिळत असल्याने आढाव यांनी संबंधित युवकावर विश्वास ठेवत त्यास अर्धा किलो सोने खरेदी करण्याची तयार दाखविली.

त्या बदल्यात २० लाख रुपयांत व्यवहार ठरला. आढाव यांनी मित्र विक्रम आहिरे याच्या मदतीने २० लाख रुपयांची जमवाजमव केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Money fraud
Chh. Sambhaji Nagar Crime : सासरच्या लोकांनी मारहाण केल्याने जावयाचा मृत्यू

सोमवारी (ता.१०) दुपारी वणी (ता. दिंडोरी) येथील बिरसा मुंडा चौकात भेटण्याचे ठरले. त्या ठिकाणी संबंधित युवक एकासोबत पिशवीत अर्धा किलो सोने घेऊन आला.

चौकात गर्दी असल्याने त्याने एका बाजूला येण्यास आढावांना सांगितले. आढाव व विक्रम आहिरे यांनी संबंधित युवकाला २० लाख रुपये दिले. त्यानंतर त्याने आढावांच्या हाती सोन्याची पिशवी देवून तो अनोळखी युवकासोबत निघून गेला.

काही अंतरावर गेल्यानंतर आढावांनी पिशवीतील सोन्याची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे समजले. त्यांनी संबंधित युवकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनोळखी युवक गायब झाला.

त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नाशिक तालुका पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया अंभोरे तपास करीत आहेत.

Money fraud
Crime News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; धारदार शस्त्राने वार करून मेहुण्याचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.