Nashik News : रामतीर्थावरील गोमुख बंदच; भाविकांकडून होतोय दूषित पाण्याचा वापर

Ramtirth News
Ramtirth Newsesakal
Updated on

नाशिक : नाशिकचे रामतीर्थ, श्रीकाळाराम, कपालेश्‍वर हे देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र रामतीर्थातील गोमुखातून येणारे शुद्ध पाणी काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे भाविकांकडून तीर्थ म्हणून रामतीर्थातील दूषित पाणी नेले जात असल्याने आरोग्याबरोबरच पावित्र्यालाही धक्का पोचत आहे.

देशभरातील पवित्र नद्यांमध्ये नाशिकच्या गंगा गोदावरीची गणना होते. त्यामुळे याठिकाणी वर्षभर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी असते. या भाविकांकडून रामतीर्थातील निर्मल जल तीर्थ म्हणून नेले जाते. (Gomukh Closed on Ram Tirtha Contaminated water is being used by devotees Nashik News)

Ramtirth News
Nashik News : शहरातून Covishield गायब; मागणी करूनही शासनाकडून अदखल

मात्र त्र्यंबकेश्‍वरपासून नाशिकपर्यंत नागरी वस्ती वाढल्याने रामतीर्थातील पाणीही मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे. त्यामुळे महापालिकेने गत सिंहस्थात रामतीर्थावरील गोमुखाला नळ जोडून चक्क नळाचेच पाणी भाविकांना तीर्थ म्हणून देण्यास सुरवात केली. अर्थात, दूषित पाण्यापासून भाविकांना त्रास नको म्हणून पुरोहित संघासह सर्वांनीच या प्रकारचे स्वागत केले.

काही महिन्यांपासून गोमुखातून येणारे पाणी बंद झाल्याने भाविक रामतीर्थातील पाणीच ‘तीर्थ’ म्हणून नेत आहेत. विशेष म्हणजे हे तीर्थ भरून नेण्यासाठी या ठिकाणी रिकाम्या बाटल्यांसह कॅनही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परंतु गोमुख बंद झाल्याने काही महिन्यांपासून भाविकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

Ramtirth News
Nashik Motivational Story : फुलांच्या माळविक्रीतून जयश्रीताईंनी उभा केला संसार

अस्थीकुंडाजवळच खड्डा

रामतीर्थाच्या उजव्या तटावर अस्थीवलय कुंड असून, याठिकाणीच अस्थी विसर्जन केले जाते. मात्र सध्या तेथे मोठा खड्डा पडला आहे. सकाळच्या सुमारास याठिकाणी दशक्रिया विधींसाठी गर्दी असते. त्यामुळे भाविकांसह अस्थी विसर्जनासाठी आलेले काही जण याठिकाणी पडून जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हे काम त्वरित पूर्ण व्हावे, अशी मागणी पुरोहित संघासह नियमित येणाऱ्या भाविकांनी केली आहे.

"कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या गोमुखातील पाणीपुरवठा भाविकांच्या सोयीसाठी सुरळीत व्हावा, याबाबत अनेकवेळा महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणीही केली आहे."

- सुरेश शुक्ल, पुरोहित

"रामतीर्थावरील गोमुख बंदच आहे. त्यामुळे भाविक रामतीर्थातील पाणीच तीर्थ म्हणून नेत असून ते आरोग्यदृष्ट्या अयोग्य आहे."

- माधुरी जोगळेकर, नाशिक

Ramtirth News
Nashik News : अर्भक दगावल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()