Nashik News: गोंदे ते पिंपरीसदो रस्त्याचे होणार 'व्हाइट टॉपिंग'द्वारे सहापदरीकरण

भुजबळांच्या सूचनेवर चव्हाणांचे लेखी उत्तर
White Topping Road File Photo
White Topping Road File Photoesakal
Updated on

Nashik News : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील वडपे ते गोंदे भागाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. गोंदे ते पिंपरीसदो या २० किलोमीटर रस्त्याचे व्हाइट टॉपिंग' या अद्ययावत तंत्रज्ञानाने सहापदरीकरण करण्यात येणार आहे.

२०२२-२३ च्या अर्थसंकल्पावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या कपात सूचनेवरील लेखी उत्तरात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली. (Gonde to Pimpris Road will be made six lane through white topping Nashik News)

श्री. चव्हाण यांनी उत्तरात म्हटले आहे, की मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा केंद्र सरकारच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणांच्या अखत्यारीत आहे. या महामार्गावरील वडपे ते ठाणे या लांबीमध्ये पावसाळ्यातील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे.

सद्यःस्थितीत अस्तित्वातील डांबरी रस्त्याचे आवश्यक त्या भागात नूतनीकरण करण्यात येत असून कशेळी व कळवा पुलाचे काम करण्यात येत आहे. उर्वरित नेहमी खड्डेमय होणाऱ्या रस्ता खंडासाठी ‘सॉईल स्टॅबिलायझेशन' ही प्रक्रिया गेल्यावर्षी राबविण्यात येऊन खड्डयांवर नियंत्रण मिळवले.

तसेच वडपे ते ठाणे या भागात वाहतूक क्षमतेएवढी अस्तित्वातील रस्त्याची रुंदी नाही. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी होत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने वडपे ते ठाणे दरम्यान रस्त्याचे काँक्रिटीकरणाने आठ पदरी रस्त्याचे बांधकामास सुरवात केली.

प्रकल्पातंर्गत आठ पदरी रस्त्यासह २ पदरी सर्व्हिस रोड, भुयारी मार्ग, लहान व मोठे पूल याचा बांधकामात समावेश आहेत. सद्यःस्थितीत प्रकल्पाचे २५ टक्के काम पूर्ण झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

White Topping Road File Photo
Nashik News: रस्त्यावर खड्डा पडल्यास अधिकारी जबाबदार : रवींद्र चव्हाण

या व्यतिरिक्त घोटी-सिन्नर, पिंपरीसदो, कसारा, आसनगाव, वाशिंद, खडवली आणि कल्याण बापगाव जंक्शनवर उड्डाणपूल अथवा बोगद्याची कामे सुरु असून रस्ता विस्तारीकरणामुळे स्थानिक आणि अवजड वाहतुकीचे विभाजन होईल.

लेखी उत्तरातील ठळक मुद्दे

० वडपे ते गोंदे या ९९.५० किलोमीटर लांबीच्या चौपदरीकरणाचे काम ‘बीओटी‘वर १२ एप्रिल २००६ पासून २० वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसह ११ एप्रिल २०२६ पर्यंत देण्यात आले

० ‘बीओटी‘मुळे केंद्र सरकार खर्च करत आहे. तसेच महामार्गावरील काही वाहतूक समृद्धी महामार्गावर वळविण्याचे नियोजन आहे

White Topping Road File Photo
Nashik News: नाशिक विभागामधील 2 हजार 904 वाड्यांसह वस्त्या अन रस्त्यांची जातिवाचक नावे बदलली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.