Nashik News : डाळींबासह फळपिकांची बळीराजाला साथ; फळांना बाजारात चांगला दर

fruit crop
fruit crop esakal
Updated on

Nashik News : तालुक्यासह कसमादे परिसरात गेल्या काही महिन्यांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ऐन उन्हाळ्यात बेमोसमी पाऊस व गारपीट झाल्याने नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा कांदा जमिनीतच सडला. (Good rate of fruit crops including pomegranate in market nashik news)

यामुळे मिळेल त्याभावाने शेतकरी कांदा विक्री करीत आहेत. निसर्गाच्या हेलकाव्यात डाळिंब मात्र शेतकऱ्यांचा सच्चा मित्र ठरला आहे. या परिस्थितीतही डाळींबाचे भाव टिकून आहेत. पपई, पेरु, खरबूज, आंबा, जांभूळ, सीताफळ आदी फळपिकांना चांगला भाव मिळत आहे. बदललेल्या वातावरणामुळे किरकोळ अपवाद वगळता टरबुजाने यावर्षी साथ दिली नाही.

यावर्षी उन्हाळा सुरु होऊन तीन महिने उलटले तरी देखील कडक ऊन पडलेच नाही. त्यामुळे टरबुजांची लाली फिकी पडली. मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत टरबुजाला दहा रुपये किलोपर्यंत घाऊक भाव होता. यानंतर उत्पादन वाढल्याने व हवामानात बदल होत गेल्याने टरबुजाचे भाव एकदम घसरले.

काही शेतकऱ्यांना पाच ते दहा रुपयांदरम्यान भाव मिळाला. मात्र एप्रिलनंतर शेतकऱ्यांना तीन ते पाच रुपये किलो दरम्यान टरबूज विक्री करावा लागला. बहुसंख्य शेतकऱ्यांचा टरबूजावर केलेला खर्च देखील निघाला नाही.

तर दुसरीकडे खरबुजाने मात्र शेतकऱ्यांना बऱ्यापैकी साथ दिली. सुरवातीला २० रुपये किलोने घाऊक भावात खरबूज विकला गेला. मेच्या सुरवातीला देखील खरबुजाचे घाऊक भाव १५ ते १७ रुपये किलो आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

fruit crop
Unseasonal Rain : प्लास्टिक कागद खरेदीला वाढली मागणी; दरात वाढ

कसमादेला सुबत्ता मिळवून देणारा डाळिंब मात्र शेतकऱ्यांचा पाठीराखा राहिला आहे. बेमोसमी पाऊस, गारपीट व बदलेल्या वातावरणात देखील डाळिंबाचे भाव टिकून आहेत. डाळिंब ७० ते १२५ रुपये किलो दरम्यान विकला जात आहे. किरकोळ बाजारात भाव शंभरापेक्षा अधिक आहेत. गारपिटीने बागलाण तालुक्यात काही बागांना फटका बसला.

आर्द्रता कमी-अधिक होत असल्याने बागांमधील फवारणीचा खर्च वाढला आहे. रमजान पर्व सुरु असेपर्यंत पपईचे भाव टिकून होते. किरकोळ बाजारात पपई ५० ते ७० रुपये किलोने विकली गेली. पंधरा दिवसापासून भाव कमी झाले आहेत.

जांभूळ दोनशे ते अडीचशे रुपये किलोने मिळत आहे. सीताफळ देखील फळ बाजारात भाव खात आहे. शंभर ते दीडशे रुपये किलोने सीताफळ विकले जात आहे. आंब्याचे भाव सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. ५० रुपये किलोपर्यंत आंबा मिळू लागला आहे. सध्या बाजारात फळांच्या राजाची रेलचेल असून ५० ते २५० रुपये किलो दरम्यान आंबे विकले जात आहेत.

"शेतकऱ्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार फळपिके घ्यावीत. शक्यतो आधुनिकीकरणाची कास धरावी. फळपिकांसाठी नेटशेडचा वापर करावा. डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. मात्र हे पीक घेताना पुन्हा तेल्या व मर रोगाचा फैलाव वाढणार नाही याची काळजी घ्यावी. कृषी विभागाच्या सल्ल्याने वेळोवेळी फवारण्या कराव्यात." - अरुण देवरे उपाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संघ

fruit crop
Unseasonal Rain : टेहेरेत कांदा पिकाचे नुकसान; शेतकरी हैराण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.